
अमीन शाह
अकोला: जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतात एका कार्यक्रम दरम्यान मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने तीस वर्षीय विवाहित महिलेचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रेशमा पवार असे मृत महिलेचे नाव आहे.
पवार कुटुंब आज त्यांच्या काजलेश्वर मधील शेतात रोडगे पार्टी करिता गेले होते. काजळेश्वर शेत शिवारात हरभरा काढण्याआधी रोडगे पार्टी चा बेत होता दरम्यान रोडगे बनवत असताना मोठ्या प्रमाणात धूर उडाल्याने शेजारी असलेल्या झाडावर बसलेले आग्या मोहाचे पोळ उठल्याने मधमाशांनी उपस्थित सर्व पाहुण्यांवर जोरदार हल्ला चढवला सर्वत्र भागम भाग सुरू झाली चिडलेल्या मधमाश्यांनि महिला व लहान मुलांवर हल्ला केला .
या हल्ल्यात 35 वर्षीय रेशमा पवार गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली आहे.
चिमुकल्या मुली आईच्या मायेस पोरक्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रेशमा पवार यांच्यासह या हल्ल्यात दोन लहान मुली,एक पुरुष व एक महिला असे सहा जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे ,














































