Home यवतमाळ सासू-जावयाची करामत: मल्टीस्टेट बँकेत बोगस कर्ज प्रकरणांचा पर्दाफाश होणार…

सासू-जावयाची करामत: मल्टीस्टेट बँकेत बोगस कर्ज प्रकरणांचा पर्दाफाश होणार…

838

यवतमाळ – शहरातील एका मल्टीस्टेट बँकेत बोगस कर्ज प्रकरणांचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.यात सासू आणि जावयाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचा संशय आहे. ही गँग केवळ एका बँकेपुरती मर्यादित नसून, शहरातील विविध बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक अंदाज समोर येत आहे.

लक्ष्मी-गोदा-चंद्र गँगचा बँकांमध्ये सुळसुळाट

गेल्या काही वर्षांत शहरातील दत्त चौक, दाते कॉलेज चौक, आर्णी रोड परिसरातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कर्ज मंजूर झाल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारी थंड बसतात ठेवून बँक प्रशासनाने आपली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला.लक्ष्मी, गोदा आणि चंद्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सर्व बँकेमध्ये ही गँग या अगोदर टप्प्याटप्प्यांना कार्यरत होती.

बोगस कर्ज प्रकरणांचा प्रकार

या गँगने कर्ज घोटाळ्यासाठी विविध युक्त्या वापरल्या –

बनावट प्लॉट खरेदी-विक्री – कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलणे.
बनावट घर खरेदी – कागदपत्रांमध्ये फेरफार करून गृहकर्ज मंजूर करवून घेणे.
गाडी खरेदीत घोटाळा – वेगवेगळ्या नावाने वाहन कर्ज मंजूर करून, नंतर त्याच गाड्या तिसऱ्या पक्षाला विकणे.
कमिशनखोरीचा साखळी व्यापार – मंजूर झालेल्या कर्जातून ठरावीक टक्केवारी कमिशन म्हणून घेतल्याचा संशय.

“सोन्याचे चमचे” येणार रडारवर?
बँकेत मोठ्या प्रमाणावर कर्ज घोटाळे करताना काही प्रभावशाली लोकांचा हात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आर्थिक गैरव्यवहारात मोठे नाव असलेल्या व्यक्तींचा सहभाग उघड झाल्यास यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडू शकते.
लवकरच एका “तांब्याचं पितळ” उघडकीस येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

आज रविवार आहे खमंग मटणाचा आस्वाद लुटत रहा आणि “पोलीसवाला” वर बातमी वाचत रहा…