
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना घाटंजी तालुक्यातर्फे मुरली येथिल शेवंताबाई झितृजी डंभे वृद्धाश्रम याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांसोबत पदाधिकार्यांनी जेवन केले व सोबत वेळ घालवला, वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी स्वादिष्ट जेवनाची, फळांची व्यवस्था शिवसेनेतर्फे करण्यात आली होती,
त्या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल-रख्माई मंदिरात आरती करून, साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली, सर्व वृद्धबांधवासोबत संस्थेचे संस्थापक
श्री. टोंगे सर यावेळी उपस्थित होते,
या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, पदाधिकारी शैलेश कनोजे, जोतीताई वाघाडे , गजानन चव्हाण, पवन चव्हाण, रुपेश नेवारे , महेंद्र राठोड, पवन अळसपुरे, अवी तिजारे , अमित जाधव, संदीप पवार, व ईतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते..











































