Home नागपूर पोलिस आयुक्तांचा ‘तो’ व्हिडिओही व्हायरल…

पोलिस आयुक्तांचा ‘तो’ व्हिडिओही व्हायरल…

346

चर्चेतले सोशल व्हायरल…

पोलिस ठाण्यात व्हिडीओ बनविणे गुन्हा नाही

पोलिस आयुक्तांचा ‘तो’ व्हिडिओही व्हायरल…

नागपूर : पोलिस ठाण्यात मोबाईलवर व्हिडीओ बनविणे हा गुन्हा नसून असा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करू नये, अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत, असा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस ठाणे येथे आमचे अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. पोलिस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे. येथे काम करणारे अधिकारी आणि पोलिस हे जनतेचे सेवक आहेत. आमच्या कोणत्याही कारवाई दरम्यान नागरिकांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यास पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यात अडथळा आणू नये, अशा सूचना यापूर्वीही देण्यात आल्या होत्या आणि चार दिवसांपूर्वी पुन्हा याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस ठाण्यासोबत रस्त्यावर पोलिस ड्यूटी करीत असल्यास आणि एखाद्या नागरिकाने व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यास पारदर्शकतेच्या दृष्टीने त्या नागरिकाला अडविण्यात येऊ नये, असेही पोलिसांना सांगण्यात आल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले.“`

परिपत्रकानुसार – जर पोलिसांनी तक्रार घेण्यास आणि पोचपावती देण्यास नकार दिला, तर तक्रारदाराला या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची कायदेशीर परवानगी आहे जे नागरिकांना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास चुकीच्या पद्धतीने नकार देतात. पोलिस जेटी सीपी व्हिडिओ आहे, पोलिस परिपत्रक दिनांक 13.6.23 व 20/12/24 कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक सेवकांसोबतच्या बैठकीचे आणि कार्यवाहीचे थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार देते. तसेच पोलिस १०० क्रमांकावर कॉल करा आणि त्यांना कळवा की पोलिस स्टेशन एफआयआर घेत नाही .