Home नागपूर CCTV लावा व बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना द्या – पोलीस निरीक्षक पंकज...

CCTV लावा व बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना द्या – पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांचे आवाहन

263

नागपुर :- सण किंवा सुटी लागली की सर्वांनाच वेध लागतात ते परगावी जाण्याचे… मात्र सुटीत गावाला किंवा सहलीवर जाताना आपल्या हद्दीतील पोलिस ठाण्याला माहिती कळवा, असे आवाहन राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी पोलिस विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी सुटीमध्ये परगावी किंवा सहलीला जाणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे. आपण आपल्या गावी जात असताना आपल्याकडील सर्व प्रकारचे दागीने, पैसे, मौल्यवान वस्तु या घरी ठेऊ नयेत. त्या एकतर स्वतः सोबत घेऊन जाव्यात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात. बंद घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेऊ नये. गावी जात असताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे,आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात सुध्दा येऊन माहिती द्यावी. जेणेकरून पोलिस पथक तुमच्या भागात गस्त घालेल.शक्य असल्यास प्रत्येकाने घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा
त्याचबरोबर नागरिकांनी तीन ते पाच घरांनी मिळून एखादा गुरखा नेमावा. रात्रगस्तवरील पोलीस कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन ठेवावा किंवा डायल ११२ वर कॉल करावा. आपल्या कॉलनी, परिसरातील फेरीवाले, किरकोळ विक्री करणारे आल्यास त्यांचे आधारकार्ड तपासावे. तो व्यक्ती स्वतःची ओळख लपवत असेल तर पोलीसांना संपर्क करावा.

‘डायल ११२’ वर संपर्क साधावा. आपल्या कॉलनी, अपार्टमेंट किंवा परिसरात संशयितरित्या एखादा व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ डायल ११२ वर संपर्क करावा. गावी जात असताना उच्च प्रतीचे कुलूप दरवाज्यास लावावे किंवा अलार्मसारखी एखादी बेल दरवाज्यास बसुन जावे. गावी जाताना घरातील, परीसरातील लाईट सुरू ठेवावेत, असे आवाहनही व.पो.नि पंकज बोंडसे यांनी केले आहे.आता सण आल्यामुळे अनेकजण आपआपल्या गावी किंवा सहलीवर जातात. जाताना आपआपल्या घराला कुलूप लावुन जातात. परंतु सदरील बंद घराचा फायदा घेऊन चोरटे घरफोडी करून सदरील ठिकाणी चोऱ्या करतात. त्यामुळे चोरी, घरफोडी या सारख्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी उपाययोजना कराव्यात तसेच पोलिस ठाण्यात माहिती द्यावी.