Home विदर्भ गणेश नगर बोरगाव येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली

गणेश नगर बोरगाव येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली

144

वर्धा:- जिल्ह्यात दि.७/२/२०२५ बोरगाव मेघे येथे कार्यक्रमात या वेळी रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती गणेश नगर बोरगाव मेघे येथे महाकाली भजन मंडळांनी रमाबाई यांची जयंती साजरी करण्यात आली महिलांनी रमाबाईचे संघर्ष त्यांच्या भजनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करून सांगण्यात आले भजन मंडळातील मंडळी यांनी रमाबाई च्या गीत सादर करण्यात आले. रमाबाई व सावित्रीबाई फुले याच्या फोटोचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच वर्धा संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष, दीपमाला मालेकर ,सल्लागार पंकज येसनकर, अनिल कोहाड, भजन मंडळातील सदस्य, रेखाताई कडू ,मंदाताई डफ ,मंदाताई गौळकर, वंदना तालन ,जिजा डहाके, निर्मला वैद्य ,लिलाबाई बहीकार, उषा चांदोर, प्रतिभा कामडी, शारदा काटकर, शारदा घंधरे, रत्ना ठाकरे, उषा क्षीरसागर, नंदा केकापुरे, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.