Home यवतमाळ मैत्री संघाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख सांस्कृतिक समाज भवनासाठी निधी उपलब्ध करण्याची...

मैत्री संघाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख सांस्कृतिक समाज भवनासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी

77

यवतमाळ,दिनांक 8 फेब्रुवारी.- मुंबई येथे दिनांक 7 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.एकनाथ शिंदे यांची मैत्री संघाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.

ही भेट मा.विधान परिषद सदस्या भावनाताई गवळी यांच्या नेतृत्त्वाखाली झाली.या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख सांस्कृतिक समाज भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळात मैत्री संघाचे पदाधिकारी सुनिल कडू, तुळशीराम लांडगे,चंद्रशेखर आगलावे,ज्ञानेश्वर गायकवाड, प्रवीण भोयर,सतिश काळे आणि नितीन बांगर यांनी सहभाग घेतला.