Home महत्वाची बातमी
24

सिंदखेडराजा मतदार संघात तिरंगी लढत ,

 

 

17 उमेदवार रिंगणात ,
अमीन शाह

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आता अखेर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे. इथे शिंदेंच्या शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना उमेदवार दिल्यानंतर एका रात्रीतून मनोज कायंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघासंदर्भात चर्चा सुरू होती.. दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.. मात्र दुपारी ३ पर्यंत दोघांपैकी एकानेही अर्ज मागे घेतला नसल्याने आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे…