
नांदेड (बालाजी सिलमवार):-किनवट तालुक्यातील राजकीय कार्यकिर्दसाठी प्रसिद्ध असलेल्या गावापैकी एक प्रसिद्ध दूंड्रा गाव या गावात प्रामुख्याने असलेल्या आदिवासी मन्नेरवारलू समाजासोबतच, गोल्लेवार समाज, सोबतच मराठा बांधव,परधान,गोंड,न्हावी आदी सर्व समाज बांधव वास्तव्यास राहतात.

गेल्या काही वर्षांपासून गावातील शिक्षण शिकून नौकरीस असलेले अधिकारी, कर्मचारी, संबंध बांधवांची गावामध्ये बैठक घेवून ग्राम विकासासाठी, गाव स्वच्छते करिता निर्धार करण्यात आले तेव्हा पासून दूंड्रा गावात ग्राम स्वछता सारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत,गावात निरोगी पर्यावरण हा स्थिर आणि उत्पादक समाज आणि भावी पिढ्यांचा पाया आहे हे ओळखण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन केले पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे.त्याचे अवचित्य साधून किनवट तालुक्यातील दुड्रा या गावात अन्न भेसळ अधिकारी नांदेड श्री. संतोषजी कनकावाड साहेब यांच्या पुढाकाराने तसेच दुड्रा ग्रामस्थ व सामजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने गावातील मुख्य रस्त्याच्या तिन्ही रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात आवश्यक प्राण वायू असलेले कडूलिंब,वड,पिंपळ असे ऐकून ४१ झाडाची लोखंडी जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, देवकते साहेब
वनरक्षक भुरके, ग्राम विकास अधिकारी अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील प्रतिष्टीत नागरिक श्री लक्ष्मण कनकावाड,तंटामुक्ती अध्यक्ष पोचन्ना आईटवार,प्रभाकर दोनकलवार, रामय्या येरडलावार,महेश कनकावाड (उपसरपंच),त्र्यंबक देवरवार, गंगय्या सल्लावार सर, रमेश राऊलवार सर ,लक्ष्मण कनकावार सर, सचिन येरडलावार,स्व. राजन्ना दोनकलवार प्रतिष्ठानचे तथा ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय शिक्षक विध्यार्थी तथा सर्व दुंड्रा ग्रामस्थ उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमामुळे पंचक्रोशीत सर्व स्तरातून दूंड्रा गावचे कौतुक होत आहे.












































