Home महत्वाची बातमी कानापूर जवळ अपघात मोटरसायकल चालक गंभीर जखमी

कानापूर जवळ अपघात मोटरसायकल चालक गंभीर जखमी

56
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०५ :- जिल्ह्यातील सेलू येथून वर्धेला जात असलेल्या दुचाकी वाहनाला मागवून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हीरो होंडा चालक गंभीर जखमी झाला.

घोराड येथील पशुधन पर्यवेक्षक गजानन संगीडवार हे सेलू वरून वर्धेला आपल्या हिरो होंडा पॅशन गाडी क्र. एम एच 32 टी 1216 ने जात असताना त्यांना मागवून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार ता.5 दुपारी तीन वाजताचे सुमारास कानापूर जवळ घडली. रस्त्याने जाणारे दिपचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राद्यापक गौर यांनी 108 क्रमांकावर फोन करूनही अँबुलन्स अली नाही. त्यामुळे ते रस्त्यावर खूब वेळ पडून राहिले. रोडने जात असलेल्या खासगी अँबुलन्सने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.