Home महत्वाची बातमी अखेर मृत्यू शी झुंज देतांना तिला आले अपयश

अखेर मृत्यू शी झुंज देतांना तिला आले अपयश

474

सिल्लोड येथील महिलेचा मृत्यू

अमीन शाह

सिल्लोड येथे बुधवारी 50 वर्षीय महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकून जिवंत पेटवण्यात आलं होता . या घटनेत महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली आहे. घाटी रूग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
किरकोळ घरगुती वादातून हे जळीतकांड घडल्याचं समोर आलं आहे. बिअर बार चालकाने महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकले. यामध्ये महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेचा आता मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बिअर बार चालक संतोष मोहितेला अटक केलं आहे.

या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरणत तापलं आहे. महिलेचे बिअर बार चालकाशी अनैतिक संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच या घटनेनंतर मुंबईतील दहिसर परिसरात देखील एका 26 वर्षीय तरूणीला देखील जाळण्यात आलं. यावरून महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल विचारण्यात येत आहे.