
➡️ वनविभागाचे सेवानिवृत्त वाहन चालक देविदास वानखडे यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार.!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील सावरगांव ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवाकडुन नमुना 8 देण्यास टाळाटाळ सुरू असुन तक्रारदार देविदास अंबादास वानखडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय महसूल अधिकारी याशनी नागराजन पांढरकवडा, तहसीलदार विजय साळवे घाटंजी, घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले आदीं कडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, सावरगांव येथील सरपंच ह्या घाटंजी येथे वास्तव्यास आहे. तर ग्रामपंचायत सचिव हे मुख्यालयी राहत नसुन घाटंजी वरुन ये – जा करत असतात, अशी विशवासनिय माहीती प्राप्त झाली आहे.
अंबादास वानखडे हे सावरगांव येथील रहिवासी होते. सावरगांव येथे त्यांच्या मालकीचे घर व जागा होती. सदर जागेचा नमुना 8 देण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार देविदास वानखडे यांनी 26 जुन रोजी सावरगांवचे सरपंच, सचिव व गट विकास अधिकारी यांचेकडे लेखी अर्जानुसार केली होती. तसेच सदरचा अर्ज सावरगांव येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत ही ठेवण्यात आला होता. मात्र, तीन महिने लोटुनही नमुना 8 देण्यात आलेला नाही, असा आरोप देविदास वानखडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे सरपंचाची सही हे पतीदेवच मारत असल्याचा आरोप तक्रारदार देविदास वानखडे यांनी केला आहे. तसेच नमुना 8 सावरगांव ग्रामपंचायतीकडुन 8 दिवसांत मिळाला नाही. तर 5 सप्टेंबर पासुन जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा तक्रारदार देविदास वानखडे यांनी शासनाला दिला आहे.











































