Home यवतमाळ घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबीर..!

घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबीर..!

89

( अयनुद्दीन सोलंकी )



घाटंजी : घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने आज बुधवार रोजी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

त्याअनुषंगाने कार्यक्रमाची सुरुवात पांढरकवडा येथील सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन रक्तदान शिबिराची सुरवात करण्यात आली.

सदर शिबिरात याशनी नागराजन मॅडम यांनी स्वतः रक्तदान करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी तहसीलदार विजय साळवे, अप्पर तहसीलदार मोहनीष शेलवटकर व नायब तहसीलदार राठोड व मंडळ अधिकारी, तलाठी वर्ग, कोतवाल, कर्मचारी आदीं उपस्थित होते.