Home यवतमाळ घाटंजी येथे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या...

घाटंजी येथे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन..!

116

 अयनुद्दीन सोलंकी 


घाटंजी :- केंद्र पुरस्कृत अमृत जलप्रकल्प 2.0 पाणी पुरवठा योजना 49 कोटी 88 लाख खर्च असलेल्या घाटंजी नगर परिषद परिसरा करीता योजनेच्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे हस्ते तर माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

जेसीस कॉलनी घाटंजी, आदर्श कॉलनी जुन्या पाण्याची टाकीजवळ घाटी, आनंद नगर घाटंजी येथे नळ योजनेच्या पाण्याचे टाकी चे भूमिपूजन संप्पन झाले.

त्यानंतर सोनू मंगलम येथे झालेल्या कार्यक्रमात मंचावर कृषी उत्प्पन बाजार समितिचे उपसभापती सचिन पारवेकर , पांढरकवडा भाजपा तालुकाध्यक्ष आनंद वैद्य, आर्णी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, घाटंजी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, साम्भारेड्डी यल्टीवार, रामसिंग राठोड़, प्रकाश पाटील डंभारे, प्रकाश खरतडे, बंडू कदम , ॲड. संदीप माटे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष राम खांडरे, माजी नगरसेविका विद्या काळे आदीं मंचावर उपस्थित होते.

प्रास्तावीक व संचालन नगर परिषदेचे माजी सभापती प्रशांत उगले यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर डंभारे, अनूप उप्पनवार, कैलास उकले, सुरेश महल्ले, होमदेव किणाके, पुंडलीक वाढई, अंकुश ठाकरे, अमित महल्ले, प्रमोद गिरी, चेतन जाधव, रंजन धांदे,देवानंद काळे, माणिक चव्हाण, बड़े बाबू, परशराम साखरकर, अरुण गोहाडे, अजय अग्रवाल, महेश ठाकरे, विजय कासार, श्रीहरी निबुदे,कदम मामा, नाना मस्के, गोलू नगरीया आदीं उपस्थित होते.