Home यवतमाळ आम्ही साऱ्या सावित्री वसतीगृहाचे उद्घाटन…!

आम्ही साऱ्या सावित्री वसतीगृहाचे उद्घाटन…!

187

आदिवासी, फासेपारधी समाजाच्या मुलींना आश्रय…

यवतमाळ (प्रतिनिधी) आदिवासी आणि फासेपारधी समाजातील मुलींसाठीच्या वस्तीगृहाचे उद्घाटन श्री राज पडगिलवार यांचे हस्ते झाले. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मुलभुत गरजांपासुन दुर्लक्षित आणि उपेक्षीत असलेल्या या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर निरागसतेसह आनंदही झळकत होता. सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमा पुजन तथा वंदन करुन छोटेखानी सोहळ्याप्रसंगी अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्ष पुनम जयपुरिया, लाँयन्स क्लबचे अध्यक्ष मंगेश शिरभाते, महाजन ट्रस्टचे विजय खोरिया, राजकुमार अग्रवाल, आनंद कसंबे, अश्विन सवालाखे, रुपा जयपुरिया, उज्वलाताई हुलके, वर्षाताई पडवे, पपीताताई माळवे यांची उपस्थिती होती.
२०१९ पासुन या मुलींचा सांभाळ करुन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यायोग्य बनविण्याचा संकल्प ईसु माळवे आणि त्यांच्या पत्नीने केला आहे. रोपटे देऊन स्वागत झाल्यावर मान्यवरांनी आपल्या भाषणांतुन या वस्तीगृहामार्फत सुरु असलेल्या सेवाकार्याचे कौतुक करित समाजाने शक्य ती मदत करण्याचे आवाहन उपस्थितांच्या माध्यमातुन केले. वस्तीगृहाचे संचालक ईसु माळवे यांनी प्रास्ताविकातुन वस्तीगृहाच्या स्थापनेपासुनचा संघर्षमय प्रवास उलगडला. प्रा. अभीजीत पवार यांनी सुत्र संचालन केले तर पपीता माळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयोजनाकरिता सोमनाथ पवार, संदिप राठोड, पप्पु पोवार, किर्ती पवार, रेश्मा राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थीनींसह संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
————
चौकट
*एस एल फाउंडेशन तर्फे सानंद सेवा सहयोग*
स्वातंत्र्यदिनी एस एल फाउंडेशन तर्फे वस्तीगृहाला कपडे, धान्य व किराण्याच्या किट मदत म्हणुन प्रदान करण्यात आल्या. चिमुकल्यांचा वाढदिवस केक कटींग करुन साजरा करुन खेळीमेळीमध्ये त्यांना खाऊ देखील देण्यात आला. फाउंडेशन तर्फे वाघाडीतील पुरग्रस्तांना यापुर्वीही मदत करण्यात आली होती. या महिनाअखेर वस्तीगृहातील मुलींचे पालन पोषण व सुरक्षेच्या दृष्टीने भरीव मदत करण्यात येणार असल्याचेही फाउंडेशनचे अश्विन सवालाखे, अतुल टाके, डाँ दिनेश विडुळकर, आशिष गायकी, जीवन पळसोकर, विलास लोहकरे, मंगेश चौधरी, आशिष हिंगलासपुरकर, मंगेश चौधरी, अरविंद गंडाईत, योगेश देशपांडे यांनी जाहीर केले.
————
चौकट
*सेवा संस्कारातुन गुरु वंदना*
एस एल फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत या वस्तीगृहातील मुलींना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मनोरंजनातुन शिक्षणासह मुल्यशिक्षणाचे धडे गिरविले जाणार आहेत. शिक्षीका प्रचिती काळे यांनी या उपक्रमाची जवाबदारी घेतली असुन फाउंडेशनचे अन्य सदस्यही या विद्यार्थीनींना कौशल्य विकासाचे प्राथमिक प्रशिक्षणाकरिता सहकार्य करणार आहेत. विद्यार्थींनींना मार्गदर्शन केल्यावर त्यांचेसाठी विविध खेळही घेण्यात आले. यावेळी प्रचिती काळे, सविता ढाले, वीणा गुल्हाने, कल्पना मोरे, पिंकी कारिया, रिता राऊत, संगिता पुरी यांची उपस्थिती होती.