Home यवतमाळ अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेचा उद्या जनआक्रोश.

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेचा उद्या जनआक्रोश.

226

 शेतकऱ्यांसह पीडितांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे मनसेचे आवाहन 

यवतमाळ/ हरीश कामारकर
गेल्या आठवड्यात जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने, शेतीसह अनेक घटकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीतील उभे असलेले पिके, शेती उपयोगी साहित्य अक्षरशः वाहुन गेलीं तरी शेती पूर्णतः खरडून गेली आहे. तर नदी काठील लोकांच्या घरात पाणी घुसल्याने घरे वाहुन गेलीं यात घरातील गृहउपयोगी साहित्य ,अन्नधान्य, कपडे वाहुन गेले. हीच परिस्थिती शहरात होती, मुसळधार पावसाचे पाणी शहरातील गटारानामध्ये न समावल्याने हे पाणी रस्त्यांवर आले परिणामी रस्त्यावर व रस्त्यांच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये, दुकानामध्ये, गोदामामध्ये शिरले यातून मोठया प्रमाणावर आर्थिक फटका रहिवाशांना बसला. या सर्व घटनांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व अतिवृष्टीग्रस्तांना मदत करणे अपेक्षित होते. परंतु शासकिय स्तरावरून केवळ पाच हजार रुपयांची तोकडी मदत जाहीर करून शासनाने या पीडितांच्या तोंडाला पाने पुसली. असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या या अतिवृष्टी ग्रस्तांच्या समर्थनार्थ “जनआक्रोश मोर्चाचे” आयोजन केले. मनसे नेते राजु उंबरकर व जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
जिल्हाभरात आठवडाभरा पूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला होता. या झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील नदी नाले धोक्याची पातळी ओलांडत होतें. यापुराच्या पाण्याने शेत जमिनी, माती व पिकांसह खरडून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने घरे पुर्णतः पाण्यामध्ये जाऊन नागरिकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्याची नासधूस होऊन अनेक कुटुंब उघड्यावर आले. यापुरांचा फटका शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना सुध्दा झाला.तर शहरातील अनेक वाहने या पाण्यात वाहुन गेली. तर दिनांक २७ जुलै रोजी यवतमाळ शहरांतील बांगर नगरात गटाराच्या ड्रेनेज मध्ये पडून एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या सह अनेक ठिकाणी जीवित हानी झाली. झालेली नुकसानाची पाहाणी मदत व पुनर्वसन मंत्री जिल्हयात आलें. त्यांच्या येण्याने शेतकऱ्यांना व पिडीतांना मदतीची आस लागली होती. मात्र या मंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात बसूनच तोकड्या मदतीची घोषणा करून पीडितांच्या तोंडाला पाणे पुसण्याचा प्रकार केला. पूर व अतिवृष्टीग्रास्तांवर झालेल्या या अन्याया विरोधात मनसेने दंड थोपटले असुन जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनींचे पंचनामे न करता सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी, अतिृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागात पडलेल्या घरांचे व संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान भरपाईची तात्काळ देण्यात यावी, पूरग्रस्त भागातील लोकांच्या घराची व वाहुन गेलेल्या साहित्यांची तात्काळ मदत देण्यात यावी, पूरग्रस्त गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, खरडून गेलेल्या जमिनीचे कामे करण्यात यावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा अशा मागण्यांना घेऊन उद्या (दिनांक ३१ जुलै) सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून जिल्हाधिकारी कार्यालयवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार करणार आहेत. या जन आक्रोश मोर्चास जिल्हयातील सर्व मनसे व मनसे अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्ह्यांतील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.