Home जळगाव कॅन्सर ग्रस्तान घेतला जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळेला करण्यासाठी ध्यास चोपडा येथील...

कॅन्सर ग्रस्तान घेतला जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळेला करण्यासाठी ध्यास चोपडा येथील राज मोहम्मद खान शिकलगर यांची जीवा पाड धावपळ

62
0

शरीफ शेख

रावेर , दि. ०४ :- चोपडा, कॅन्सर महणजे मृत्यू ज्याचं फक्त नाव ऐकल्यावर मोठं मोठ्यांची पाया खालची वाळू सरकते व थरकाप सुटते पण काही लोक असे ही असतात जो या जीवघेण्या आजारावर मात करून आपले आयुष्य त्याचा जनजागृती करण्यासाठी लावतात असेच जीवंत उधारण चोपडा शहरातील राज मोहम्मद खान शिकलगर यांचे देता येईल आज जागतिक कर्करोग दिना निमित्त 10 वर्षा पूर्वी कॅन्सर वर मात करून आपले आयुष्य तंबाखू मुक्त अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान साठी समर्पित केले आहे.

2010 मधे शिकलगर यांना तंबाखू चा व्यसन मुळे तोंडाचा कॅन्सर झाला होता आजार मोठा होता जीवन मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती न होती पण राज मोहम्मद यांनी हार पत्करली नाही अल्लाह कडे रडून प्रार्थना केली जे चूक माझा कडून झाली ते दुसऱ्या कडून व्हायला नको ज्या तंबाखू मुळे माझा जीवन उध्वस्त होत आहे ते दुसऱ्या चा व्हायला नको म्हणून पुढच्या आयुष्य या कामा साठी खर्च करेन अल्लाह ने त्यांची प्रार्थना ऐकली नातेवाईक मित्र मंडळ चा अथक परिश्रम ने राज मोहम्मद याला भिक्षेत आयुष्य मिळाला चांगले झाल्यावर त्यांनी केलेलं पर्ण पूर्ण करण्यासाठी महिण्याचे 12 दिवस या कामा साठी काढले सतत आपलं कार्य चालू ठेवले जन मानवता बहुउद्देशीय संस्था द्वारे त्यांनी कॅन्सर पेशनत हेल्प सेन्टर ची स्थापना केली व तंबाखू विरोधी अभियान चालू केले आता पर्यंत शिकलगर यांनी 300 चं वरती लोकांची तंबाखू ,गुटखा चे व्यसन सोडवलं आहे 500 च्या वरती कॅन्सर ग्रस्त लोकांना मार्गदर्शन व मदत केली आहे त्यांचे हे कार्य अविरत पणे चालू आहे ते कॅन्सर ग्रस्त परिवारातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात ,अन्न धान्य चे किट देतात , मुलीनं लग्नाचं साहित्य देतात , लवकरच शिलाई मशीन देऊन कॅन्सर ग्रस्त परिवार चे पुनर्वसन करणार आहे व कॅन्सर ग्रस्त परिवारातील मुलींचे 1 रुपया मध्ये लग्न लावणार आहे

शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,सलाम मुंबई फौंडेशन मुंबई, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ,व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा द्वारे जळगाव जिल्हा हे जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळे चा करण्यासाठी जोरात अभियान चालू आहे या अभियानात राज मोहम्मद यांनी आपल्याला झोकून दिले आहे अहो रात्र त्यांचे प्रयत्न आहे आपला जळगाव जिल्हा हे लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा व्हावा असे त्यांचे प्रयत्न आहे या कॅन्सर ग्रस्तान घेतलेला ध्यास अनेक लोकांना प्रेरणादायी आहे आपण जीवघेण्या आजारावर मात करून त्याला हरवू शकतो व मिळालेले बोनस आयुष्य हे लोकांचं मदत साठी खर्च करू शकतो असे या कॅन्सर ग्रस्त योद्धा ने दाखवून दिले आहे राज मोहम्मद यांची या कामात धडाडी प्रेरणादायी आहे ते जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती मध्ये सदस्य पण आहे ,या अभियानात त्यांना जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे साहेब,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रताप उगले साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एस, एच, चौहान साहेब ,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पाटील साहेब ,शिक्षणाधिकारी रणदिवे साहेब ,बी जे पाटील साहेब, देवांग साहेब ,विजय पवार साहेब,शिवदे साहेब, सलाम मुंबई फौंडेशन चे अजय पिळणकर साहेब, संजय आंघे साहेब जळगाव जिल्हा समनव्यक जयेश माळी साहेब, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष चे डॉ नितीन भारती साहेब राहुल ब्राहाटे व सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख ,मुख्यध्यपक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे लवकरच आपला जळगाव जिल्हा हे तंबाखू मुक्त शाळेचा व्हावा या कामी कॅन्सर ग्रस्त योध्याला चांगला निरयोगी दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रभूचरणी कामना करूया.

Unlimited Reseller Hosting