Home मराठवाडा फेसबुकवर आपत्तीजनक पोस्ट , “तणावपूर्ण शांतता”

फेसबुकवर आपत्तीजनक पोस्ट , “तणावपूर्ण शांतता”

41
0

सययद नजाकत

भोकरदन , दि. ०४ :- प्रेषित मोहम्मद स. पैगंबर यांच्या बद्दल आणी समाजा बद्दल फेसबुक वर आपत्ती जनक पोस्ट टाकल्या मुळे व धार्मिक भावना दुखावल्यामुळे रविवारी संध्याकाळी शहरात तनावपुर्ण शांतता पसरली होती.
तालुक्यातील पळसखेळा मुर्तड येथील युवकाने आपल्या फेसबुक अकाऊंट वर अनेक आपत्ती जनक पोस्ट शेयर केली आहे. पोलीसांनी युवकाचे फेसबुक अकाऊंट पुर्ण चेक केले असून शहरात काही विचित्र प्रकार घडु नये या साठी धर्म गुरू यांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
यासंदर्भात नागरीकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणी घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला याविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये यांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल असे या वेळी जायभाये यांनी सांगितले.
याप्रकरणी वसीम खान यांचा फिर्यादीवरून दगडू जाधव याच्या विरूद्ध भोकरदन पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास लक्ष्मण सोन्ने करीत आहे.
आरोपीला लवकर अटक करण्यात येईल, जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असा हट्ट धरून बासलेल्या नागरीकांना पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये यांनी आश्वासित केले की आरोपीला लवकर अटक करण्यात येईल.

Unlimited Reseller Hosting