Home बुलडाणा सुट्टीवर आलेल्या जवानाचे अल्पशा आजाराने मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचे अल्पशा आजाराने मृत्यू

84

दोन दिवस सुट्टी बाकी आसताना काळाची झडप…!

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगांव राजा : तालुक्यातील मेहुणा राजा येथील सुपुत्र मनोहर संतोष जाधव हे भारतीय तिबेट सीमा सुरक्षा पोलिस दलातील जवान एक महिन्याच्या सुट्टीत गावाकडे आला होता. गावाकडे त्यांना कावीळ चे लक्षण जाणवल्याने औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते दरम्यान दोन दिवस सुट्टी बाकी असताना अल्पशा आजाराने १० जुन रोजी निधन झाले.मृतक जवानांवर आज (ता.११) रोजी रहात्या गावीअंतसंस्कार करण्यात आले.
मनोहर संतोष जाधव हा जवान नक्षलवादी भागामध्ये छत्तीसगड येथे कर्तव्यास हजर असुन एक महिन्याच्या सुट्टीवर गावाकडे मेव्हणा राजा येथे आला होता. १२ जुन रोजी सुट्टी संपुन कर्तव्यास हजर होणार असतांना अल्पशा आजाराने त्यांचे १० जुन रोजी छत्रपती संभाजी नगर येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना दुर्दैवाने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, व तिन वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या बटालियन कडून त्यांना सलामी देण्यात आली.तर सरपंच मंदाताई विष्णु बोंद्रे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.मेहुणा राजा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे नेते धनशीराम शिंपणे,बाजार समितीचे सभापती समाधान दादा शिंगणे, उपसभापती दादाराव खर्डे,बाजार समिती संचालक डॉ रामप्रसाद शेळके,एल.एम शिंगणे,संतोष खंडेभराड,मनोज कायदे,डॉ कायदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गीते यांच्यासह परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या वाहनात जवानाचा मृतदेह त्यांच्या घराकडे सन्मानपूर्व आणत असताना देऊळगाव राजा शहरातील शहीद जवान स्मारका जवळ माजी सैनिकांसह सामान्य जनते कडून मानवंदना देण्यात आली.