Home यवतमाळ आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आज दिलेल्या आश्वासनाला पांच...

आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आज दिलेल्या आश्वासनाला पांच वर्ष लाऊ नये – माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर

181

( अयनुद्दीन सोलंकी )

————————-
घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन कोठारी, उपसभापती सचिन देशमुख पारवेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आर्णी- केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे हे उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, आमदार डॉ. संदीप धुर्वे, ज्येष्ठ भाजपा नेते मधुसूदन चोपडे, भाजपा सरचिटणीस मुकूंद कदम, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन बेजंकीवार, भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके आदींचे समायोजित भाषने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन देशमुख पारवेकर यांनी केले. संचालन नगर परिषदेचे माजी सभापती प्रशांत उगले यांनी केले. आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रप्रकाश खरतडे यांनी मानले.

या प्रसंगी राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री
हंसराज अहिर म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सन्मान केल्याने मी त्यांचा आभारी आहे. तसेच जो पर्यंत अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांचे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीवर लक्ष राहील तो पर्यंत घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती ही यवतमाळ जिल्ह्यात नंबर एकवर राहील, असे या वेळी अहिर म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारया शेतकऱ्यांना निवासाची व्यवस्था करने अत्यंत गरजेचे असुन भोजनाची व्यवस्था सुद्धा करने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले.

माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर म्हणाले की, आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आता जे आश्वासन दिले. त्याला 5 वर्ष लाऊ नये. कारण घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत जीर्ण झाली असुन ती इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे घाटंजी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची सुसज्ज इमारत तत्काळ मंजूर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत पारवेकर यांनी यावेळी व्यक्त केले. या वेळी राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी, उप सभापती सचिन देशमुख पारवेकर, संचालक चंद्रकांत पाटील इंगळे, संचालक संजय गोडे, संचालक नंदकिशोर डंभारे, संचालक चंद्रप्रकाश खरतडे, संचालक हनुमान मेसराम, संचालिका सौ. शुभांगी जिरापुरे व संचालिका सौ. देवकीबाई जाधव आदींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.