Home बुलडाणा शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी ,

शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी ,

54

शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी ,

 

परस्पर विरोधी तक्रारी वरून गुन्हे दाखल ,

बुलडाणा ,

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या देऊळगाराजा ते चिखली रोडवर सरंबा फाट्याजवळ गोपी माधव लॉन्सच्या बाजूला देऊळगामही येथील शिवाजी किसन भोरजे आणि रमेश हिम्मतराव भोरजे यांची शेती आहे. दोघांची शेती नॅशनल हायवे रोडवर असल्याने एकाने रोडला लागून २० गुंठे शेतीची जबरदस्तीने ताब्यांत घेवून नागरणी केली. असे का केले म्हणून एकमेकांनी गैरकायद्याची मंडळी जमून मिरची पावडर फेकून हातामधील लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने तुफान हाणामारी झाली आणि ट्रॅक्टरवर पेट्रोल टाकून पेटवून नुकसान केले. या हाणामारीत शिवाजी किसन भोरजे, सदाशिव किसन भोरजे, संदीप शिवाजी भोरजे, किरण सदाशिव भोरजे, केतन सदाशिव भोरजे, रंजना शिवाजी भोरजे, सौ.संध्या सदाशिव भोरजे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या आलेल्या मेडिकल सर्टिफिकेटवरून अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार यांनी फिर्यादी शिवाजी किसन भोरजे यांच्या तक्रारीवरून आरोपी रमेश हिम्मत भोरजे, सुरेश हिंमत भोरजे, नीतेश हिम्मत भोरजे, प्रशांत बबन भोरजे, निखिल दिलीप पवार रा. चिंचोली निपाणी ता. भोकरदन, जिल्हा जालना, सुरेश दगडोबा मुसदवाले रा. झोटिंग, ता. सिंदखेडराजा, सौ. पारू नीतेश भोरजे, रोहित रमेश भोरजे, ब्रह्मा श्यामलाल जाधव, बबन लक्ष्मण जाधव यांच्याविरुध्द कलम ३०७, ३२५, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ४०२ या भारतीय दंडविधानाच्या कलमांसह १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

तर रमेश हिम्मत भोरजे यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवाजी किसन भोरजे, सदाशिव किसन भोरजे, केतन सदाशिव भोरजे, संदीप शिवाजी भोरजे, किरण सदाशिव भोरजे, युवराज रावजी मुसदरवाले सर्व राहणार देऊळगावमही यांच्याविरुध्द कलम ३२६, ३२४, १४३, १४७, २४९ भारतीय दंडविधानाच्या कलमांसह १३५ महा.पो.आधि नियमनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर रात्रीला पोलिसांनी कलम ३०७ प्रकरणातील आरोपी रमेश हिम्मतराव भोरजे, प्रशांत बबन जाधव, बबन लक्ष्मण जाधव, सर्व रा. देऊळगावमही यांना अटक केली होती. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार गणेश हिवरकर यांनी भेट देऊन आढावा घेतला. अधिक तपास पोलिस करत आहेत. शेतीच्या वादातून भावकी जीवावर उठल्याने व त्याचा व्हिडिओच व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.