Home वाशिम मानोरा खून प्रकरणातील चाकूहल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीसह १० आरोपींना ३६ तासांचे आत...

मानोरा खून प्रकरणातील चाकूहल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीसह १० आरोपींना ३६ तासांचे आत अटक

30

फुलचंद भगत

वाशिम:-पोलीस स्टेशन मानोरा जि.वाशिम येथे फिर्यादी अनंता साहेबराव कुडवे, वय २० वर्ष, रा.बेलोरा ता. मानोरा जि.वाशिम यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. मानोरा येथे यातील नमुद एकुण १० आरोपीविरुद्ध अप क्र.२७८/२०२३ कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, ३२३, ५०६ भादवि सह वाढीव कलम १०७, १०९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अश्या प्रकारे आहे की, ग्राम मांगकिन्ही येथील आरोपी नामे प्रविण बाळु मळघणे याचे त्याच गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्याच मुलीला आरोपी हा नेहमी फोनव्दारे व प्रत्यक्षरित्या त्रास देत असल्याने मुलीने तिचे नातेवाईक यातील मृतक नामे शिवदास विलास उघडे, वय १९ वर्ष, व्यवसाय – शिक्षण, रा. बेलोरा ता. मानोरा यास सांगीतले वरुन यातील आरोपीताला समजावुन सांगण्याकरीता दि.२६/०५/२०२३ रोजी मानोरा येथील शिवाजी चौक येथे बोलावीले. तेव्हा आरोपी हा त्याचे सोबत ९ ते १० व्यक्तींना घेवुन आला. यातील मृतक शिवदास उघडे हा त्यांना समजावुन सांगत असतांना त्यांच्या वाद होवुन त्या वादामध्ये आरोपीतांनी शिवदास उघडे व त्याचा साथीदार राहुल मनोहर चव्हाण वय २५ वर्ष रा. भुली ता. मानोरा यांना मारहाण केली व आरोपीतांनी त्यांचे जवळील चाकुने मृतक शिवदास उघडे याच्या छातीवर व पोटावर भोसकुन त्याचा मृत्यु घडवुन आणला तसेच मृतक याचा साथीदार नामे राहुल चव्हाण याच्या पायावर व पोटावर चाकुने वार करुन त्यास गंभीर जखमी केले व घटनास्थळावरुन सर्व आरोपी फरार झाले. यातील मृतक शिवदास उपडे याचा याचा ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला तसेच राहुल चव्हाण याला गंभीर चाकुचा वार असल्याने त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे उपचार सुरु आहे.
यातील नमुद आरोपी नामे श्रीकांत उर्फ बबड्या पुंडलीक दावणे यास ग्राम गायवळ येथुन तर आकाश गोविंदा अगलदरे रा. गोरेगाव ह.मु. कारंजा हा इंदिरा नगर, कारंजा येथून दि.२६.०५.२०२३ रोजी अटक करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने नमुद गुन्ह्यातील आरोपी हे मांगकिन्ही येथील जंगल शिवारात लपुन असल्याची माहीती मिळाल्यावरुन सापळा रचुन आरोपी नामे पंजाब दत्ता झळके, प्रविण बाळ मळघणे, अविनाश संतोष दावणे, सर्व रा. मांगकिन्ही याना ग्राम मांगकिन्ही जंगल शिवारातून तर यातील मुख्य आरोपी अविनाश उर्फ शुभम गोविंदा अगलदरे, रा.गोरेगाव यास मुर्तीजापुर, हतगाव जिनिंग येथून व त्यास कारंजा येथील स्वप्नील अशोक काळे याने त्यास मो.सा.ने पळवुन लावण्यास मदत केल्याचे सांगीतल्यावरून त्यास शिवाजी नगर कारंजा येथुन तसेच कुणाल भगवान अगंम व भारत संतोष अंभोरे, प्रदीप बाळू मळघने अशा सर्व आरोपींना (एकूण १०) आरोपींना दि.२८.०५.२०२३ रोजी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अप्पर पोलीस अधिक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.महेश कुचेकर सोबत, मपोउपनि.सविता वडे, पोउपनि.रामेश्वर नागरे, पोहेकॉ.गणेश जाधव, मयुरेश तिवारी, दिपक ढोबळे, नरेंद्र खाडे, प्रेमसिंग चव्हाण नापोकॉ.बालाजी महल्ले, संतोष चव्हाण पोकॉ.बंशी चव्हाण, मनोज राठोड, करण ढंगारे, सुरज खाडे यांनी केला.