Home यवतमाळ मंगल कार्यालयाच्या सांडपाण्यासाठी न.प.च्या पिण्याची पाईपलाईन फोडली.

मंगल कार्यालयाच्या सांडपाण्यासाठी न.प.च्या पिण्याची पाईपलाईन फोडली.

132

व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करुन, नुकसान भरपाई करुन घेण्याची मागणी.

पांढरकवडा : माऊली मंगल कार्यालयातील सांडपाणी काढून टाकण्यासाठी कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी जेसीपी आणून रस्ताच खोदून टाकला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाकडे जाण्याच्या मार्गावर माऊली मंगल कार्यालयासमोरील नगरपरिषदेची पिण्याची पाईपलाईन फुटली आहे.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय, नेताजी सुभाषचंद्र वार्ड,कोलाम पोड,शास्त्री वार्ड याठिकाणी पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे माऊली मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि नुकसान भरपाई करुन घ्यावी. अशी मागणी माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केली.
यासंदर्भात नुकतेच निवेदन
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे पाठविले आहे.

१७ मे २०२३ रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान माऊली मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक श्री अरुण बाजोरिया यांनी जेसीपी द्वारे पूर्णपणे रस्ता खोदून त्या ठिकाणी त्यांच्या मंगल कार्यालयाच्या सांडपाण्याकरीता सिमेंट पाईप टाकत होते व त्या ठिकाणी नगर परिषदेची पिण्याची पाईपलाईन होती. ती पाईपलाईन फुटल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय, नेताजी सुभाषचंद्र बोस वार्ड, कोलाम पोड, शास्त्री वार्ड या ठिकाणी पिण्याची पाणी मिळाले नसल्याने नागरिकांना गैरसोय झाली आहे. माऊली मंगल कार्यालय, रेस्टॉरंट अँड हॉटेल संपूर्णप्रमाणे गैर कायदेशीररित्या आहे. त्या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम केले गेले आहेत. तसेच नगररचना विभागाने परवानगी दिली नसल्याचे निर्देशनास आले आहे. नगरपरिषद व स्थानिक नागरिकांची कोणतीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत त्याठिकाणी साऊंड सिस्टिम वाजत असल्यामुळे नागरिकांना नाहरकत त्रास होत आहे.

रहिवासी वस्ती भागांमध्ये मंगलकार्य असल्यामुळे लग्न समारंभाचे जेवणाचं पूर्ण नासडलेले अन्न त्या ठिकाणी साठल्या जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी अन्यथा नाईलाजास्त संपूर्ण नागरिकांना नगरपालिकेसमोर आंदोलन करावे लागेल.असाही इशारा माजी नगरसेवक तथा ट्रायबल फोरम जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी दिला आहे.

*नगरपरिषदेकडे माहितीच उपलब्ध नाही.*
नवीन मंगल कार्यालयाला बांधकाम परवानगी दिली आहे का ? जागा कशासाठी आरक्षित होती ? यासंदर्भात नगरपरिषदेला माहिती अधिकारात विचारले असता कार्यालयीन नस्ती नुसार माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारी नगरपरिषद पांढरकवडा यांनी कळविले आहे.

*बेकायदेशीर मंगल कार्यालय*
मंगल कार्यालयाला कोणत्याच प्रकारची परवानगी घेतल्या गेली नाही. मंगल कार्यालयाच्या अगोदर त्याठिकाणी भय्यूजी महाराज बी.एड, डि.एड महिला महाविद्यालय होते. कालांतराने महाविद्यालयाचे रुपांतर मंगल कार्यालयामध्ये होऊन त्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे.
– अंकित नैताम माजी नगरसेवक.