Home यवतमाळ बेकायदेशीर माऊली मंगल कार्यालय सिलबंद करुन गुन्हा दाखल करा

बेकायदेशीर माऊली मंगल कार्यालय सिलबंद करुन गुन्हा दाखल करा

224

मुख्याधिकारी यांना पत्र; कोट्यवधीचा टँक्स व इतर महसूल बुडविला

पांढरकवडा : येथील माऊली मंगल कार्यालय , रेस्टॉरंट हॉटेल करीता कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि संपूर्ण बांधकाम अवैधरित्या केले असल्यामुळे त्याचा वापर ताबडतोब थांबवून सीलबंद करण्यात यावे आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केली आहे.

कॉटेज हॉस्पिटल रोडवरील माऊली मंगल कार्यालय , रेस्टॉरंट व हॉटेल करीता पोलीस, ग्रुह,शाँप अँक्ट,फायर अँक्ट, मुंबई पोलीस अँक्ट, अन्न व औषध प्रशासन विभाग,नगर रचना विभाग, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग आदींच्या कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि संपूर्ण बांधकाम अवैधरित्या केले आहे.

१७ मे २०२३ रोजी रात्री दहा वाजताच्या अंदाजे माऊली मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापक यांनी जेसीपी द्वारे पूर्णपणे रस्ता खोदून, त्या ठिकाणी त्यांच्या मंगल कार्यालयाच्या विषारी दुर्गंधयुक्त सांडपाणी बेकायदेशीरीत्या सोडण्यासाठी सिमेंट पाईप टाकत असतांना त्या ठिकाणी असलेली नगर परिषदेची पिण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय, नेताजी सुभाष चंद्र बोस वार्ड, कोलाम पोड, शास्त्री वॉर्ड या ठिकाणी पिण्याची पाणी मिळाले नसल्याने नागरिकांना गैरसोय झाली आहे.

नगरपरिषद व स्थानिक पोलीस प्रशासन व नागरिकांची कोणतीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत त्या ठिकाणी साऊंड सिस्टिम , डी.जे. वाजवून प्रचंड ध्वनी प्रदूषण करून नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

अगोदर त्या ठिकाणी भय्यूजी महाराज बी.एड, डि.एड महिला महाविद्यालय होते. कालांतराने मंगल कार्यालयामध्ये रूपांतर होऊन त्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट मंगल कार्यालय यामध्ये त्यांनी रुपांतर केले.

तसेच त्या ठिकाणी पार्किंगची व फायर फाईटिंगची व्यवस्था केली गेली नाही. नागरिकांकरिता कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. रहिवासी भागांमध्ये नागरिकांचे लग्न समारंभाचे जेवणाचं पूर्ण नासडलेलं अन्न त्या ठिकाणी साचल्या जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

*५ वर्षात कोट्यावधीचा टँक्स बुडविला*
या संपूर्ण जागेचा व त्यावरील इमारतीचा उपयोग / वापर हा वाणिज्य आणि कमर्शिअल असून नगरपरिषदेचा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स आणि इतर महसूल गेल्या ५ वर्षापासून बुडविलेला आहे. बेकायदेशीर बांधकाम करून त्या ठिकाणी आपला धंदा सुरू केलेला आहे. संबंधित मंगल कार्यालयाला तातडीनं सीलबंद करण्यात यावे व बेकायदेशीर मंगल कार्यालयावर हातोडा ठोकण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.

*अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागेल*
या गंभीर प्रकरणात हयगय करून कायदा मोडणाऱ्या लोकांना नगर परिषद प्रशासनाने कोणतेही बेकायदेशिर संरक्षण दिल्यास त्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार करावी लागेल आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल

-अंकित नैताम
माजी नगरसेवक पांढरकवडा