Home वाशिम मंगरुळपीर येथील अतिक्रमणमुक्त मोहीमेविरोधात व्यावसायिक आक्रमक

मंगरुळपीर येथील अतिक्रमणमुक्त मोहीमेविरोधात व्यावसायिक आक्रमक

118

अतीक्रमन निष्कासनाच्या कारवाईला स्थगीती मिळण्याची मागणी


वाशिम:-मंगरुळपीर शहरातील वाहतुकीस अडथळा येणारे अतिक्रमण काढणे योग्य आहे परंतु गरिब गरजु लोक दुकाने थाटुन व्यवसाय करुन गुजरान करतात अशांचे अतिक्रमण निष्काशीत करणे म्हणजे त्यांचे कुटुंब ऊध्वस्त करणे असल्याने सदर अतिक्रमण मोहिमेस स्थगीती द्यावी या मागणीसाठी शेकडो व्यावसायीकांनी प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे.
मगरुळपीर शहरात रस्त्यालगतचे अतिक्रमन निष्काशन करण्याचा प्रशासकीय पातळीवर घेतलेला निर्णय अभिनंदनीय असून योग्य प्रकारचाच आहे. परंतू रहदारीस अडथळा नाही असे अतिक्रमन निष्काशीत होणार नाही याची सुद्धा प्रशासकीय पातळीवर दखल घेणे गरजेचे आहे.मिनी बॅक आहे. शहरामध्ये आपले सहकार चे सेतु आहे, संगणकीय प्रणाली चे काम करणारे दुकाणे आहे. ज्याच्या आधारे शहरासहीत गामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे व्यवहार आहे. अशी अतिक्रमनावरील दुकाणे हटवली तर सामान्य मानसाच्या समस्या अधिक वाढणार आहे. कुठल्याही प्रकारच्या नोटीस न देता अचानक अतिक्रनाची निष्काशन कारवाई सुरु होत असल्यामुळे अतिक्रमन धारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच्या दुकाणात लाखोच्या किंमतीचा माल आहे.
कॅप्युटर, लॅपटॉप, आहेत तर त्याना थोडा वेळ मिळावा या करिता दिनांक २१ मे २०२३ रोजी अतिक्रमण निष्कासन मोहीमेला स्थगीती देण्यात यावी. अन्यथा तिव्र स्वरुपाच आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही दलित पॅन्थरचे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदिशभाई ईंगळे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.यावेळी दलित पॅन्थरचे भाई जगदिश कुमार इंगळे,तृतीयपंथी संघटनेच्या श्रावणी,सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड,कुंताबाई भगत यांचेसह शेकडो व्यावसायीकांची ऊपस्थीती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206