Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील अनेक श्रीमंत शेतकऱ्यांना अंत्योदय योजनेच्या धान्याचा लाभ..!

घाटंजी तालुक्यातील अनेक श्रीमंत शेतकऱ्यांना अंत्योदय योजनेच्या धान्याचा लाभ..!

47

➡️ श्रीमंत शेतकऱ्यांचे अंत्योदय कुपन तात्काळ रद्द करुन गरिबांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याची मागणी.!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील अनेक गावांत श्रीमंत शेतकऱ्यांना नियमबाह्य अंत्योदय योजनेचा लाभ शासनाकडुन मिळत असुन त्यांचे रास्त भाव कुपन नियमानुसार तात्काळ रद्द करुन खरया लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अ. इरफान यांनी शासनाकडे आहे. विशेष म्हणजे नियमबाह्य अंत्योदय योजनेचा लाभ देणारया दोषी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर सुद्धा नियमानुसार कारवाई करण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांचे कडे लेखी तक्रारीतुन केली आहे.

विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, बचत गट, स्वतंत्र रास्त भाव दुकानाचे १०४ परवाने आहे. मात्र, अनेक गावांत खरया लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नसुन अनेक श्रीमंत शेतकऱ्यांना ज्यांचे कडे ५/५, १०/१० एकर शेती आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक आहे. अशा लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ शासनाकडुन नियमबाह्य रित्या देण्यात येत आहे. यात घाटंजी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अनेक अधिकारयांचे हात गुंतलेले असुन दोषी असलेल्या संबंधित अधिकारी यांचे विरोधात नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडुन महाराष्ट्र अनुसूचित विशेष वस्तू (वितरणाचे अधिनियम) आदेश १९७५ अन्वये दिलेल्या अधिकार नुसार रास्त भाव दुकानदारांना प्राधिकारी पत्र देण्यात येते. मात्र, रास्त भाव परवाना धारक दुकानाचे व धान्य ठेवण्याच्या गोडाऊन इत्यादी ठिकाणाचे नकाशे सुद्धा परवाना धारक यांचेकडे, तसेच पुरवठा विभागात सुद्धा उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नियमानुसार परवाना धारक दुकानदारांकडुन नियमानुसार रास्त भाव दुकानाच्या जागेचा नकाशा व रास्त भाव धान्य साठवणुक करण्याचे ठिकाणाचा नकाशा नियमानुसार बंधनकारक असुन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सुद्धा कोणतेही दुकान व गोडाऊनचे नकाशे उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच अनेक गावांत दुकानाच्या जागेचा नकाशा सुद्धा दिलेला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. तसेच घाटंजी तालुक्यातील अनेक रास्त भाव दुकानदाराचे रास्त भाव परवाने सुद्धा नुतनीकरण करण्यात आलेले नसुन, रास्त भाव दुकान परवाने नुतनीकरण न करताच धान्यांचा नियमबाह्य वाटप शासनाकडुन करण्यात येत असल्याचा आरोप अ. इरफान यांनी केला आहे.

तरी घाटंजी तालुक्यातील खरया लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देऊन श्रीमंत शेतकऱ्यांचे अंत्योदय कुपन रद्द करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. तसेच घाटंजी तालुक्यातील रास्त भाव दुकानाची तपासणी करून परवाण्यात नमुद असलेल्या ठिकाणी रास्त भाव परवाना दुकान आहे वा नाही, याची तपासणी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.