Home राष्ट्रीय दिल्ली दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

127

नवी दिल्ली, 6 मे 2023

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे :

“या वर्षातील पहिलीच स्पर्धा आणि विजेतेपद!

88.67 मीटरच्या सर्वोत्तम जागतिक नोंदीसह उत्कृष्ट भालाफेक, @Neeraj_chopra1 नीरज चोप्राने  दोहा डायमंड लीग मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा.”