Home यवतमाळ आज न मन प्रभू ही सेवासंस्काराची संगीत रजनी

आज न मन प्रभू ही सेवासंस्काराची संगीत रजनी

69

एसएल फाउंडेशनचे आयोजन…!

यवतमाळ (प्रतिनिधी) दाते कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येत सुरू केलेल्या एसएल फाउंडेशन तर्फे
*न मन प्रभू* या आगळ्या वेगळ्या संगीत रजनीचे आयोजन केले आहे.
संताजी प्लॉटमधील नंददीप फाउंडेशनच्या मनोरुग्ण निवारा केंद्रात आज रविवारी (30 एप्रिल) सायंकाळी 6.30 ला होणार असलेल्या कार्यक्रमात लीना सारंगपाणी, वर्धा आणि प्रा. बुधरत्न लिहितकर, नागपूर हे आपल्या वाद्यवृंदासह विविध प्रेरणादायी गाणी सादर करणार आहेत.
मनोरुग्णांचे (प्रभुजी) संगीत उपचार, मनोरंजन होऊन त्यांचे मनोबल वाढावे. त्यांच्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या सेवाव्रतींचा गौरव व्हावा. समाजात श्रमसंस्काराचा चांगला संदेश जावा, आपल्या सर्व संस्था, संघटना व समाजसेवकांना प्रेरणा व ऊर्जा मिळावी याकरिता या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि आपणासही नवचेतना मिळण्यासाठी कृपया समाजसेवी व संगीतप्रेमी यवतमाळकरांनी अवश्य कार्यक्रमाला यावे असे आवाहन करण्यात आले आहे.