Home महत्वाची बातमी पत्नी समोरच प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

पत्नी समोरच प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

206

 

अमीन शाह ,

औरंगाबाद ,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील एक प्राध्यापक आपल्याच विद्यार्थिनीचा दोन वर्ष लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ही विद्यार्थीनि बुलडाणा जिल्ह्याची रहिवासी असल्याचे समजते संतापजनक म्हणजे पत्नीच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरु होता. इतकंच नाही तर प्राध्यापकाची पत्नी त्या प्राध्यापकाला या कामी मदतही करत होती. या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर आणि पत्नी पल्लवी बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडित विद्यार्थिनी वसतिगृह शोधत होती. प्राध्यापक बंडगर स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून त्या मुलीला राहण्यास घेऊन आले. आरोपी बंडगरच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचं आश्वासन तिला दिलं. जुन 2022 मध्ये पहिल्यांदा बंडगरने तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, पण याला तीने विरोध केला. त्यानंतर जुलै 2022 मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडित मुलगी झोपली असताना बंडगरने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी 2023 मध्ये हा सर्व प्रकार मुलीने बंडगरच्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचं तीने सांगितलं. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राध्यापक बंडगर पत्नी आणि दोन मुलींसह फरार झालं आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मुलीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या या घटनेने औरंगाबाद मध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केली जात असून विद्यापीठाच्या नावालाही गालबोट लागलं आहे.

दरम्यान, बलात्काराचा आरोप असलेल्या प्राध्यापक अशोक बंडगर याला बलात्कार प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येत आहे ‌ तसंच त्यांच्यावर

बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता धारा 376 (बलात्कार), 109 , 114 आणि 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून
आपल्याच विद्यार्थिनी सोबतच या प्राध्यापकाने कुकर्म केल आहे त्याबाबत विद्यापीठ स्तरावर चौकशी सुद्धा होणार आहे