Home मराठवाडा मुलाने बापाला खर्चाला पैशे मांगीतले बापाने नाकार दिलं अन , विपरितच घडलं...

मुलाने बापाला खर्चाला पैशे मांगीतले बापाने नाकार दिलं अन , विपरितच घडलं ??

247

 

 

पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

समशेर खान

सेलू ,

वडील घरी खर्चाला पैसे देत नसल्याने दारू पिवून पैसे उडवत असल्याचा राग मनात धरुन मुलानेच आपल्या बापाच्या कुऱ्हाडेने मानेवर व खांद्यावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे . मानवत तालुक्यातील ताडबो रगाव येथील दत्तात्रय देवीदास भोकरे असे मयताचे नाव आहे . आरोपी मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे याच्या विरोधात मानवत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे . बाबासाहेब दत्तात्रय भोकरे यांनी मानवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . २४ एप्रिल रोजी रात्री ९ ते २५ एप्रिल रोजी सकाळी १२:४५ वाजे च्या दरम्यान ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात दत्तात्रय देवीदास भोकरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता . मानवत पोलिस स्टेशनचे बिट अंमलदार पोह भारत नलावडे , नामदेव पवार , राजु इंगळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली मयत व्यक्तीची संपूर्ण माहिती काढली असता त्यात हा मृत्यू म्हणजे खूनच असल्याचे स्पष्ट झाले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस यातील आरोपी परमेश्वर भोकरे याने त्याचे वडील दत्तात्रय देविदास भोकरे हे घर खर्चाला पैसे न देता त्यांच्या मित्रासोबत दारू पिवून पैसे उडवत होते याचा राग मनात धरुन त्यांची कुऱ्हाडीने घातक हत्याराने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारहाण करुन खून केला , या बाबत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अट करण्यात आलेली आहे . मानवत पोलिस स्टेशनंचे पोलीस निरिक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे हे पुढील तपास करीत आहेत . घटनास्थळास परभणी पोलीस अधीक्षक आर . रागसुधा आर , उप विभागीय पोलीस अधिकारी गोफने , यांनी भेट दिली आहे .