Home पालघर जव्हार शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत यांच्याकडून 15 हजाराची आर्थिक मदत

जव्हार शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत यांच्याकडून 15 हजाराची आर्थिक मदत

249

जव्हार :-सोमनाथ टोकरे

जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काशट वाडी मधील गरदवाडी येथील मोहन हरीचंद्र कडू यांचे अवकाळी पावसाच्या वादळीवाऱ्या मुळे घराचे छप्पर पूर्ण उडविले. ते घटनाची बातमी कळताच गोरगरिबांचे कैवारी दानशूर व्यक्तिमत्व असणारे जव्हार शिवसेना तालुका प्रमुख विनायक रावजी राऊत व लोकयुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या कडून मोहन कडू यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्वखर्चाने नुसतानग्रस्त मोहन कडू याला 15000 ची आर्थिक मदत केली. आज मंगळवार हा आदिवासी समाज मोडा पाळतात, त्यामुळे मुलासाह वास्तव्य आज घराबाहेर होते त्यामुळे जीवित हानी टळली, त्यांचे घराचे छप्पर सिमेंट पत्रे पूर्ण खाली कोसलळे व त्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असून, मोहन कडू यांचा घराचा तात्काळ पंचनामा करून तलाठी यांना निवेदन देऊन पाहणी करून तातडीची मदत मागितली आहे.परंतु गरीब कुटुंबाच संसार वाऱ्याने उघड्यावर पडला आहे त्यामुळे जव्हार शिवसेना तालुका प्रमुख श्री. विनायक राऊत व लोकनियुक्त सरपंच श्री. कल्पेश विनायक राऊत यांनी त्यांना लगेच तातडीची मदत म्हणून त्यांचे घराचे झालेल्या संपूर्ण पत्रे देऊन कडू कुतुबियांना आर्थिक मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत यांचे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये तसेच जव्हार तालुक्यामध्ये लोकांनी नुसकानग्रस्त माणसांला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.या प्रसंगी ग्राम.सदस्य,त्रिंबक रावते, नामदेव खिरारी, पप्पू होळकर, प्रकाश कवदरे, शंकर इल्हात, यशवंत इल्हात, भालचंद्र शिंदे उपस्थित होते त्यामुळे नुकसान ग्रस्त मोहन कडू यांनी मला देवरूपामध्ये मला जी मदत केली ती खूप माझ्यासाठीमोलाची आहे.घराचे छप्पर आणि आर्थिक घेतल्याबद्दल राऊत साहेबांचे कडू यांनी व ग्रामस्थांनी विशेष आभार मानले.