प्रतिनिधी – प्रमोद झिले
वर्धा / हिंगणघाट – वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रकाश नारायणदास बूंब यांना लाच स्वीकारताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लागवडीचे कामे शासनाकडून मिळाली होती त्यापैकी तीन टप्प्यांत रक्कम अदा करण्यात आली होती उर्वरित रक्कम मिळणे बाकी होते त्यावेळी बूंब यांनी तक्रारदारास एकूण कामाचे ५% लाच मागितली होती परंतु ही रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता दर्शविली असता ही तडजोड २.५% टक्क्यांपर्यंत आली त्यामुळे तक्रारदार याने या संदर्भात लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने दि.६एप्रील रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान तक्रारदार हे रक्कम देण्यास प्रकाश नारायणदास बूंब यांच्या शासकीय निवासस्थानी गेले तेंव्हा तेथे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बूंब यांनी तक्रारदारास कडून १ लाख रुपये स्विकारल्यानंतर तक्रारदार हे बूंब यांच्या शासकीय बंगल्यातून बाहेर पडुन त्यांनीं काम झाले असल्याचा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला आणि ताबडतोब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अभियंता डी.सी. खांडेराव यांच्या टीमने पंचासमक्ष कार्यवाही करत झाडाझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात तक्रारदाराने दिलेली रोखरक्कम मिळाली सदर कार्यवाही करताना त्यांच्या घरात नगदी स्वरूपात ६ लाख ४० हजार रुपये मिळाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डी.सी.खांडेराव यांनी सांगितले उर्वरित तपास सुरू असून
ही कार्यवाही एसीपी देवराव खांडेराव, संतोष बावनकूळे, प्रदीप कूचनकर, रवींद्र बावणे, प्रशांत वैद्य,प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे हे करीत आहे.