Home बुलडाणा पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या ,

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या ,

67

 

पती ला अटक ,

अमीन शाह

बुलडाणा ,

शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस या कारणावरुन पत्नीसोबत वाद घालत पतीने गळा आवळून खुन केला. ही घटना 3 एप्रिल 2023 रोजी देऊळगाव राजा येथे घडली. याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने बाबत मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील शिवाजी पार्क भागातील रहिवासी सुनील भास्कर गिते ३५ याने ३ एप्रिल रोजी त्याची पत्नी शिवकन्या सुनील गिते २५ हिचे सोबत सकाळी 10.30 वाजता शाळेतून येणाऱ्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली, या कारणावरुन वाद घातला. दरम्यान त्याने शिवकन्या गिते हिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला होता. याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता. मात्र प्रतीक्षा होती शवविच्छेदन अहवालाची. दरम्यान ५ एप्रिल 2023 रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गिते यांनी खुनाची कबुली दिली. आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली अधिक तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.