Home मुंबई पत्रकार निलेश धुरी यांचा शशिकांत वारिशे करण्याचा षडयंत्र,आरे पोलिसांची संशयास्पद भूमिका…!

पत्रकार निलेश धुरी यांचा शशिकांत वारिशे करण्याचा षडयंत्र,आरे पोलिसांची संशयास्पद भूमिका…!

76

आरे पोलिसांकडून अद्याप गुन्हा नोंद नाही !

आरे पोलिसांकडून भूमाफिया,महसूल चोर व हप्ते खोऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न ?

मुंबई/सिद्धार्थ काळे:-

भ्रष्टाचार विरोधामध्ये वृत्तपत्रामधून बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून नुकतीच रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वरिशे यांची गुंडांनी हत्या केल्याचा आरोप शशिकांत वारिशे यांच्या परिवार व विविध पत्रकार संघटनानी आरोप केला आहे.असाच प्रकार आरे दुग्ध वसाहतीतील विविध भ्रष्टाचार,करोडो रुपयांचे घोटाळे जनआधार टाइम्स या साप्ताहिकात ठोस पुराव्यानिशी उघडकीस आणत असल्यामुळे जनाधार टाइम्सचे संपादक निलेश धुरी यांची देखील मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी भर दिवसा चार चाकी गाडी अंगावर घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला.त्यावेळी हल्लेखोराने महसूल चोर, भूमाफिया यांची नावे घेऊन धुरी यांना धमकी देत मारहाण केली.आरे दुग्ध वसाहत हा परिसर जंगल परिसर असल्याने या ठिकाणी कोणीही येत जात नसल्याने पत्रकार निलेश धुरी यांचा दोन अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करत पत्रकार निलेश धुरी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली,या मध्ये निलेश धुरी हे दुचाकीवरून जमिनीवर कोसळून पडले,धुरी जमिवर पडल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी निलेश धुरी यांना मारहाण करत तू खूप आरे मधील बातम्या लावतोस तुला जास्त समजत आहे.असे म्हणत मारहाण करत होते परंतु रस्त्यावरून एक दोन बाई सर येत असल्याचे बघून सदर इस्मानी त्या ठिकाणाहून पळ काढला.

विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांकडून अपघात घडल्याचा गुन्हा नोंद करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे पत्रकारांमध्ये नाराजी आहे.

भविष्यात पत्रकार शशिकांत वारेशी यांच्याप्रमाणे माझी देखील हत्या केली जाऊ शकते.अशी तक्रार निलेश धुरी यांनी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्त,अप्पर पोलीस आयुक्त कांदिवली,डीसीपी झोन 12 यांना लेखी पत्राद्वारे दिली होती.

यापूर्वी देखील निलेश धुरी यांना भीती निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने धमकी देण्यात आलेली आहे.तसेच वीस ते पंचवीस गुंडांनी त्यांच्या राहत्या घरावर हल्ला देखील केला आहे.15 जानेवारी 2021 रोजी धुरी यांच्यावर आरे पोलीस स्टेशनमधील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार व तपास अधिकारी आशिष कार्ले यांनी झोपडपट्टी गुंडांसोबत,महसूल चोरांसोबत आर्थिक संगणमत करून खोटा गुन्हा नोंद केला असल्याची तक्रार करत न्यायालयात खटला देखील दाखल केला आहे.

विशेष म्हणजे दहा-पंधरा दिवसापूर्वीच दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आरे पोलिसांच्याच हद्दीत मुंबई फास्टट्रॅकचे पत्रकार इस्माईल शेख यांना देखील ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचा देखील गुन्हा नोंद झाला असून वारंवार अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.