Home मराठवाडा देगलूरला जिल्हा करण्याच्या मागणीसाठी 2 फेब्रु. रोजी जाहीर सभा…!!

देगलूरला जिल्हा करण्याच्या मागणीसाठी 2 फेब्रु. रोजी जाहीर सभा…!!

57
0

राजेश भांगे

नांदेड , दि. ०१ :- देगलूर चे नाव कोणत्याही प्रस्तावित जिल्ह्याला न जोडता देगलूरलाच स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सर्व समावेशक नागरिकांची दि 2 फेब्रुवारी रोजी येथील गांधी पुतळ्याजवळ सकाळी 11 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जिल्ह्यात नांदेड पाठोपाठ भौगोलिक, सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात देगलूर तालुका अग्रेसिव्ह म्हणून संबोधले जाते. किंबहुना देगलूरला उपजिल्हाचा दर्जा ही आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून देगलूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी शासन दरबारी नोंद आहे असे असताना प्रस्तावित उदगीर जिल्ह्यात देगलूर चे नाव समाविष्ट होणार अशा वावड्या उधळू लागल्याने देगलूरकरांचे मस्तक तापू लागले आहे तसेच आज पर्यंतच्या लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळेच देगलूरला जिल्ह्याचा दर्जा मिळू शकले नाही या पार्श्वभूमीवरच “देगलूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा” या मागणीसाठी सर्वसमावेशक नागरिकांची जाहीर सभा दि 2 फेब्रुवारी रोजी येथील गांधी गांधी चौकात आयोजित करण्यात आली आहे . तरी या सभेस सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

Unlimited Reseller Hosting