Home पश्चिम महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती” इंदापूर,पत्रकार दिनाच्या निमित्ताने दोन जिल्हाधिकारी राहाणार उपस्थित.

“पत्रकार संरक्षण समिती” इंदापूर,पत्रकार दिनाच्या निमित्ताने दोन जिल्हाधिकारी राहाणार उपस्थित.

67

पुणे,सोलापूर जिल्हाधिकारी प्रमुख पाहुने उपस्थित राहणार.

 पत्रकार संरक्षण समिती इंदापूर च्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने निरा नरसिंह पुर (इंदापूर)परीसरातील कोरोना काळात सामाजिक काम करणाऱ्या १०१ जणांचा सत्कार.

पुणे –  कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार, अंगणवाडी सेविका, नर्स, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचा सन्मान रविवार दिनाक २२ जानेवारी रोजी डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे,मिलींद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर ,अँड संतोष शिंदे हायकोर्ट वकील,अनिल चौधरी प्रदेश सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी दिली.

 प्रसंगी दत्तात्रय भरणे आमदार इंदापूर विधानसभा, हर्षवर्धन पाटील माजी सहकार मंत्री तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सह अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित राहाणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंदरे पाटील यांनी सांगितले.