Home मराठवाडा ग्रामविकास अधिकारी अडकला ACB  च्या जाळ्यात….!!

ग्रामविकास अधिकारी अडकला ACB  च्या जाळ्यात….!!

17
0

लाच घेतांना रंगेहाथ अटक….!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०१ :- तक्रारदाराला व त्यांच्या साथीदारांना रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड व विहीर खोडकामाचा ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी 4 हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोर ग्रामविकास अधिकारी याला अँटी करपसशन विभागाचे पथकाने शनिवारी (दि.१) रंगेहाथ पकडले. सुधाकर नारायणराव घुले (वय ५३) असे लाचखोर ग्रामविकास अधिकार्याचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील पिशोर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुधाकर घुले यांच्या कडे तक्रारदार यांनी व त्यांच्या तीन मित्रानी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड व विहीर खोडकामाचा ग्रामसभेचा ठराव मागितला होता. 31 जानेवारी रोजी घुले यांनी तक्रारदाराला तुमचे आणि तुमच्या मित्राचे असे प्रत्येकी 1 हजार रुपये प्रमाणे 4 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. तकरदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अँटी कररप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अँटी कररप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक गणेश ढोकरत, जमादार विजय ब्राह्मदे, सुनील पाटील, विलास चव्हाण, केदार कंडे, कपिल गाडेकर, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने टीव्ही सेंटर भागात सापळा रचून सुधाकर घुले याना 4 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.