
यवतमाळ – महाराष्ट्र शासन केवळ जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांना आपले शिक्षक नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांवर सातत्याने अन्याय करीत आहेत. 100% वेतन व पदोन्नतीत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यातील 10 हजार शिक्षक नगरविकास विभागाच्या पर्यायाने मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा राज्य नपा व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी केली.











































