
घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना – ट्रक – दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गहिनीनाथनगर येथील कट पॉईट वर घडली.
धुळे -सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांवरून गहिनीनाथ नगर येथील कट पॉईंट वरून ट्रक क्रमांक एमएच १६ ए.एफ.८८८८ भरधाव वेगाने रस्ता ओलांडून सर्व्हिस रोडला जात असताना महाकाळा येथून पाथरवाला खुर्द येथे जात असताना दुचाकी क्रमांक एम.एच.२१ बी.टी.४१८५ यांच्यात धडक झाली.
या धडकेत सोमनाथ बप्पासाहेब डोईफोडे (वय ४० वर्षे) हे जागीच ठार झाले.तर बबन विठ्ठल साबळे (वय ५२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहे.दोघेही रा.पाथरवाला खुर्द ता.अंबड येथील रहिवासी असून या अपघातातील जखमीस रुग्णवाहिकेतून अंबड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मयत यास ही शवविच्छेदना साठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.