Home यवतमाळ घाटंजी येथील गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांना विनयभंग प्रकरणी अटक..!

घाटंजी येथील गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांना विनयभंग प्रकरणी अटक..!

204

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी – घाटंजी येथील गिलानी मुलांच्या विद्यालयात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा (वय 13, रा.ईस्तारी नगर, खापरी ता. घाटंजी) विनयभंग केल्याप्रकरणी गिलानी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सचिन बळवंत ठाकरे (वय 35, आनंद नगर, घाटंजी) यांचे विरुद्ध भादंवि कलम 354 (ड) (विनयभंग करणे), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवुन घाटंजी पोलीसांनी आरोपी सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांस बुधवारी अटक केली आहे.
दरम्यान, घाटंजी पोलीस आरोपी सचिन ठाकरे यांस यवतमाळ न्यायालयात हजर करणार असून त्याची न्यायालयीन कोठडी मागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तथापि, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे हे तपास करीत आहे.

मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एक अल्पवयीन पिडीता ही शाळेत शासनाकडुन प्राप्त झालेले तांदुळ आणण्यासाठी शाळेतील कार्यालयाजवळ गेली होती. तेथे गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे उभे होते. त्या वेळेस शिक्षक ठाकरे हे अल्पवयीन पिडीतेला विचारले की, तुला परिक्षेत किती गुण मिळाले आहे, तेव्हा पिडीतेने चांगले गुण मिळाले नसल्याने शिक्षकाला सांगितले. त्या नंतर तांदुळ आणण्यासाठी घरुन आणलेली थैली क्लासरुम मधुन आणण्यासाठी गेली असता वर्गात सहाय्यक शिक्षक ठाकरे हे खुर्चीवर बसुन होते. त्यावेळेस अल्पवयीन पिडीतेला शिक्षकाने ईशारा करुन जवळ बोलावले. त्यामुळे अल्पवयीन पिडीता व त्याची मैत्रीण भार्गवी घोडे हे दोघेही शिक्षकाजवळ गेले. त्या वेळी सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे तु इतक्या दिवसांपासून माझ्या सोबत बोलत कां नाही, असे अल्पवयीन पिडीतेला विचारले. तसेच तु मला फोन कां करित नाही व नाश्त्यासाठी सुद्धा घरी बोलावली नाही, असे सांगितले. सदरची घटना अल्पवयीन पिडीतेने त्याची मैत्रीण प्रियंका ठक हिला सांगितले. तेव्हा तिने म्हटले की, तुला फोन कर याचा अर्थ समजला काय..? असे म्हटले वरुन, अल्पवयीन पिडीता व मैत्रीण यांनी वर्ग शिक्षक डी. मस्के यांना सांगितले. त्यावर मस्के म्हणाले की, सचिन ठाकरे यांचे नेहमीचे हेच नाटक आहे. ते दरवर्षी एका मुलीला फसवत असतो, अल्पवयीन पिडीतेला सांगितले. नंतर मस्के हे गिलानी विद्यालयाचे उप प्राचार्य बुरांडे यांना घटनेची माहिती दिली. त्या वेळेस उप प्राचार्य बुरांडे हे मी ठाकरे यांना समजावुन सांगतो, असे म्हटले. तेव्हा अल्पवयीन पिडीतेने त्यांना शाळेतुन काढुन कां टाकत नाही, असे उप प्राचार्य बुरांडे यांना म्हटले.

गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे मागील दोन महिन्यांपासून वाईट उद्देशाने ईशारे करुन घरांकडे जातांना माझा पाठलाग करत असुन अल्पवयीन पाडीतेचा विनयभंग केल्याच्या जबानी रिपोर्ट वरुन आई माधुरी हेंमत काळे सह घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वरुन आरोपी विरुद्ध पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपी यांस अटक केली आहे.

पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.