Home जळगाव महाराष्ट्र सरकार तर्फे “स्वतंत्र दिव्यांग (विभाग) मंत्रालय घोषित केल्याबद्दल मुक्ती फाउंडेशन तर्फे...

महाराष्ट्र सरकार तर्फे “स्वतंत्र दिव्यांग (विभाग) मंत्रालय घोषित केल्याबद्दल मुक्ती फाउंडेशन तर्फे लोकप्रतिनिधींचा गौरव

64
0

 

जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील दिव्यांगांचा मूलभूत प्रश्न सुटावा व त्यांचे पुनर्वसन, तसेच जलद विकास व्हावा या हेतूने स्वतंत्र दिव्यांग (विभाग) मंत्रालयाची घोषणा झाल्याने महाराष्ट्र सरकारचे, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी दिव्यांग विभागाचा सतत पाठपुरवठा केला ते माजी मंत्री आमदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या सह सर्व मंत्री गण सोबतच सर्वच लोकप्रतिनिधी विधानसभा, विधान परिषदेतील सन्माननीय आमदार यांचे जाहीर आभार सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे मांडण्यात आले.

या दिव्यांग विभागाची घोषणा झाल्याने त्याची अंमलबजावणी ही लवकर झाल्यास दिव्यांगांचा राहिलेला विकास व सकारात्मक पुनर्वसन त्वरित होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने या दिव्यांग विभागाची घोषणा केल्यामुळे दिव्यांगांतर्फे मान्यवर लोकप्रतिनिधी यांचा नुकताच प्रतिनिधीक स्वरूपात गौरव करण्यात आला असून यात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळातील कर्तव्यदक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय ना.गुलाबरावजी पाटील, ग्रामविकास, क्रीडा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय ना.गिरीशभाऊजी महाजन यांच्यासह विधानसभा सदस्य आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोरआप्पा पाटील यांचा दिव्यांग प्रतिनिधी म्हणून सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन, दिव्यांग केंद्रा तर्फे मुकुंद गोसावी, सोपानराव गणेशकर, डॉ.एम व्ही पटेल,धनंजय पाटील, दिलीप खामकर, वैभव निकुंभ,जयेंद्र पाटील, राकेश कोल्हे आदीं तर्फे गौरव करण्यात आला.
स्वतंत्र दिव्यांग विभाग अस्तित्वात येत असल्यामुळे राज्यातील बिकट अवस्थेत असलेल्या घटकाला खरा व सकारात्मक न्याय मिळून मोठ्या प्रमाणात विकासाचे कार्य होईल तसेच दिव्यांगांच्या मनात असलेला न्यूनगंड यामुळे दूर होऊन दिव्यांग निश्चितच स्वयंभू होईल. कारण दिव्यांगांना दयेची भीक नको तर कार्य स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मायेचे बळ व सेवेची संधी हवी. आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याने हा विभाग निर्माण झालेले त्यांच्यासह सर्वच मंत्री गण लोकप्रतिनिधी यांचे मनापासून आभार फक्त या विभागाची जलद गतीने अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्हीही पाठपुरावा करू मुकुंद गोसावी दिव्यांग प्रतिनिधी

Previous articleहुशेनी सिमेंट व अंबुजा सिमेंट कंपनी तर्फे बांधकाम ठेकेदारांना मार्गदर्शन
Next articleघाटंजी येथील गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांना विनयभंग प्रकरणी अटक..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here