
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील पोलीस स्टेशनच्या मागेच असलेल्या शनिमंदीरालगतच्या अनिल चव्हाण यांच्या घरी दिवसाढवळ्याच चोरांनी डल्ला मारुन रोख रखमेसह सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना घडली असुन या चोरीची माहीती मिळताच मंगरुळपीरचे ऊपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन माहीती घेतली व पुढील तपास सुरु केला आहे.

मंगरुळपीर शहरात चोरींचे सञ सुरुच असुन दोन दिवसापुर्वीच दिवसाढवळ्या चोरीची घटना हडल्यानंतर पुन्हा पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच असलेल्या शनि मंदिरालगतच्या अनिल चव्हाण यांच्या घरी दुपारी दिड वाजताच्या सुमारास चोरांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागीन्यावर हात साफ केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहीती मिळताच ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करत तपासासंदर्भात पोलिसांना आवश्यक त्या सुचना करुन पुढील तपास सुरु केला आहे.अनिल चव्हाण हे परिवारासह बाहेरगावी गेलेले आहेत.त्यांची आई दुपारच्या दिड वाजताच्या सुमारास घराला कुलुप लावुन लगतच्याच शनि मंदीर परिसरात सोयाबिन वाळत टाकन्यासाठी गेली असता यादरम्यान चोरांनी संधी साधुन घराचे कुलुप तोडुन चोरी केल्याचे समजले.कपाटात असलेले रोख पासष्ट हजार आणी पंधरा ग्राम सोन्याच्या पोतेसह मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याचे कळते.यासंदर्भात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करणे सुरु असुन पोलीसांनी गतीने तपासचक्र फिरवत पुढील तपास सुरु केला आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206











































