
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : घाटंजी येथे तीन वर्षा पूर्वी विद्युत वितरण कंपनीत रुजु झालेले विद्युत सहाय्यक उपअभियंता मानिक प्रभु नगराळे यांचे हृदय विकाराच्या तिव्र धक्याने अमरावती येथे निधन झाले.
मानिक प्रभु नगराळे यांनी आपल्या सौजन्य शिलतेने आणि प्रेमळ वागणूकीने संपूर्ण घाटंजी शहरवासीयांना आपलेसे केले होते. रात्री – बेरात्री कितीही वाजता भरपावसातही आपली चमु घेऊन विद्युत पुरवठा खंडित झाला असला तरी तो पूर्ववत सुरू करण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय प्रामाणिक आणि प्रेमळ स्वरुपाचा असा विद्युत अधिकारी लाभने घाटंजीकरांचे भाग्यच होते.
नगराळे यांच्या जाण्याने फार मोठी भरून न निघनारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असे दोन अपत्ये आहे.
विशेष म्हणजे रात्री त्यांची निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर अक्षरशः त्यांच्या श्रद्धांजलीचा पाऊस पडला. घाटंजी शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. तीच त्यांच्या कार्याची पावती समजल्या जात आहे. अल्पावधीत येऊन सर्वांचे मन जिंकणारे विद्युत सहायक अभियंता माणिक प्रभू नगराळे यांच्या निधनाने घाटंजीत हळहळ व्यक्त होत आहे. मराठी पत्रकार बहुउद्देशीय संस्था व विश्वरत्न फाउंडेशन घाटंजीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.











































