Home यवतमाळ करमना घाटंजी येथे सामुहीक भाऊ-बिज सोहळा

करमना घाटंजी येथे सामुहीक भाऊ-बिज सोहळा

174

यवतमाळ. – भाजपा भटक्या विमुक्त (व्हिजेएनटी.) आघाडी यवतमाळ जिल्हाच्या वतिने अतिदुर्गम भागातील भटक्या विमुक्त समाजांची वसाहत असलेल्या मौजा करमना ता.घाटंजी येथे सर्व समाजातील बांधवांचा “सामुहिक भाऊ-बिज स्नेहमिलन सोहळ्याचे* आयोजन करण्यात आले होते,.

या कार्यक्रमाचे अध्यक्षा भटक्या विमुक्त आघाडीच्या विदर्भ प्रांताध्यक्ष सौ.रश्मिताई जाधव, पुर्व विदर्भ संयोजिका जयश्रीताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजपा व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांनी आयोजन केले होते, याप्रसंगी भटक्या विमुक्त, आदिवासी, बहुजन समाजातील ७५ भावांना ओक्षवंत करून त्यांची सामुहीक ओवाळनी करून त्यांचे सन्मान सौ.रश्मीताई जाधव व सौ.जयश्रीताई राठोड यांनी केले, ७५ भावांची सामुहिक भाऊ-बिज म्हणजे *देशात सुरू असलेले अमृत महोत्सवाची पर्वणी प्रमाणे भटक्या विमुक्त समाजात असलेल्या अठरा पघड जाती जमातींच्या लोकांनी संघटीत होणे ही काळाची गरज आहे,

तरच आपले प्रश्न सुटतील, आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या समस्येचे निराकरण निश्चितच करतील असा विश्वास रश्मीताईंनी आपल्या भाषणातुन दर्शविले तर जयश्रीताई राठोड यांनी आपली भटकंती थांबवून मूलांमुलींना उच्च शिक्षण देण्याचे आवाहन केले, मोहन जाधव यांनी भटक्या विमुक्त, आदिवासी, बहुजन समाजातील लोकांवरील अन्याय सहन केल्या जाणार नाही. असा इशारा आपल्या भाषणातून दिले, याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष विजयभाऊ चव्हाण, सरपंच सौ.रिनाताई रुपेश चौके, उपसरपंच बालूभाऊ कारेवार, करमना शाखा अध्यक्ष किशोर चव्हाण, नानाजी पेटेवार, रविंद्र कोष्टे, ओम पारटकर,सोनू गेडाम, अणूप हेमक, विजू गिनगूले, अभिषेक कुंभारे, आशुतोष चौधरी, महेश भेदूरकर, आकाश गूल्लरवार, पवन धाडसे, यांचेसह व्ही.सी.गृपचे सर्व युवा बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुहिक भाऊ-बिज स्नेहमिलन सोहळा संपन्न झाले तर कार्यक्रमाचे संचलन रविंद्रजी कोष्टे यांनी केले.