
दिवसभरात 348 रोपांना केले आळे,सैनिकांच्या दोन जोत्याना केले झुडपातून मुक्त.

आळे करण्यात आले.
२)सैनिकी जोत्याना झुडपातून मुक्त करतांना सुरू असलेले श्रमदान.
नाशिक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १६१ वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम (दि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी) अजिंक्य दुर्ग रामशेजवर झाली.रामशेजच्या ऐतिहाशिक,पर्यावर्णीय समतोल टिकवून ठेवण्यासाठी झालेल्या या मोहिमेत दिवसभरात केलेल्या श्रमदानात ३४८ भारतीय प्रजातीच्या आपट्याची,निंबारा,
करंज या रोपट्यांना आळे करण्यात आले तर माथ्यवारील दोन सैनिकी जोत्याना झुडपातून मुक्त करण्यात आले.यावेळी दुर्गजागृती अभियानातून किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना रामशेजचा इतिहास व किल्ला बघावा कसा?याबद्दल माहिती शिवकार्य चे संस्थापक दुर्गआभ्यासक राम खुर्दळ यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील दुर्गांच्या अस्तित्वासाठी गेल्या २१ वर्षे अभ्यासपूर्ण पद्धत्तीने शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था श्रमदानातून कार्य करीत आहे.नष्ट होणाऱ्या पडझडीत नावालाच उरलेल्या इतिहासाच्या गडकोटांवरील पाऊलखुणा टिकवण्यासाठी,होळकर बारवा,जुन्या ज्ञात अज्ञात समाध्या,विरगळी,जुनी देवळे,चिरे टिकवण्यासाठी शिवकार्य राबत आहे.नाशिकच्या उत्तरेस असलेल्या रामशेज किल्ल्याचे अखंड दुर्गसंवर्धनाचे कार्य गेल्या अनेक वर्षे संस्था स्वखर्चाने व कष्टाने करीत आहे.सह्याद्रीतील डोंगर टेकड्या वाचवणे,
किल्ल्याच्या भूमीत लागणारे वणवे थांबवणे,जीव धोक्यात टाकून विझवने,अशी कामे ही अखंडित सुरू आहे.१६ रोजी झालेल्या मोहिमेत नाशिकचे नवे सिडको येथील आर के पलटण अँकेडमी चे विद्यार्थी शिक्षकांनी ही श्रमदानात सहभाग घेतला.यावेळी सर्वांना किल्ले प्लॅस्टिकमुक्त ठेवा,कचरामुक्त ठेवा,नो सेल्फीचा वापर करा,पर्यावरण जपा,सुरक्षित दुर्ग बघा,किल्ल्यांच्या ऐतिहाशिक वास्तू जपा,अशी जागृती शिवकार्यवतीने करण्यात आली.या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक दुर्गव्याख्याते राम खुर्दळ,सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ वाघमारे, श्रमसमिती प्रमुख भूषण औटे,खजिनदार किरण दांडगे,रोहित गटकळ,जयराम बदादे,रवी माळेकर,यासह दुर्गसंवर्धक उपस्थित होते.
चौकट :-
रामशेजच्या माथ्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक यांनी प्लास्टिकमध्ये विकलेल्या पाणी बाटल्या व अन्न पाकिटे किल्ल्यावर अस्ताव्यस्त पडतात ते थांबवावे,तसेच किल्ल्यावर लावण्यात आलेल्या ३४८ भारतीय प्रजातीच्या झाडांना शेळ्या खात असल्याने त्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत यांना पत्र देण्यात येणार आहे.तसेच रात्री किल्ल्यावर येणाऱ्या कपल्स वर बंदी घालावी.अनुचित घटना टाळावी.येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणी व्हावी,किल्ल्यावर सुरक्षेबाबत कुठलीही यंत्रणा नाही याबाबतीत वन विभाग,दिंडोरी पोलीस,यांना पत्र देण्यात येणार आहे.









































