

नाशिक ( प्रतिनिधी| )
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने दि. ५ रोजी दसऱ्याच्या नाशिकच्या गोदावरी तीरावर संत गाडगेबाबांच्या मठासमोर असलेल्या, अत्यंत दुरवस्थेत असलेल्या सरदार वीर जयाजी बलकवडे,त्यांचे पुत्र वीर बहिर्जी बलकवडे यांच्या दोन समध्यांची स्वच्छता व समध्यांच हार,फुले वाहून या वीरांच्या स्मृतींना,रस्त्यांच्या काँक्रीटीकरनात केवळ नावालाच उरलेल्या समाध्यांबाबत जागृतता यावी,तसेच या वीरांच्या त्याग बलिदानाची स्मृती निरंतर राहावी यासाठीचा कार्यक्रम इतिहास अभ्यासक,दुर्गसंवर्धक,शिवप्रेमीं च्या उपस्थितीत गोदातीरी झाला.यावेळी दोन्ही समाध्यांच अस्तित्व वाचवण्यासाठी यापुढे ही निरंतर प्रयत्न करण्याचा यावेळी उपस्थितांनी संकल्प केला.









































