Home जळगाव ३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला , ” घातपाताचा संशय”

३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला , ” घातपाताचा संशय”

242

जळगाव – आनंद पाटिल )  – ३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह जळगाव तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर आढळून आला आहे. घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील भादली कानसवाडा रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सोमवारी ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता भादली येथील पोलीस पाटील राधीका ढाके यांनी नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात केली आहे.
चौकशी अंती सौरभ यशवंत चौधरी (वय ३२, रा. जुने खेडी रोड, दशरथ नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी मयत सौरभ चौधरी यांच्या मोबाईलवरून कुटुंबाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान आई, बहिण व मामा यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची ओळख पटली. याप्रकरणी पोलीसांत नोंद घेण्याचे काम सुरू आहे.