Home बुलडाणा तो आनंदात गरबा दांडिया खेळत होता अन , ??

तो आनंदात गरबा दांडिया खेळत होता अन , ??

271

गरबा दांडिया खेळणे पडले महागात ,

 

गुजराती हॉटेल चालकाचा मृत्यू ,

अमीन शाह

बुलडाणा ,

जिल्ह्यातील जानेफळ येथे नवरात्रीनिमित्त गरबा आयोजित केला होता. यावेळी गरबा खेळत असताना रविवारी रात्री एका ४७ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार विशाल पधारिया (वय ४७) असे मृत  हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या आकस्मिक घटनेमुळे क्षणभरातच गरबास्थळी शोकाकूल वातावरण झाले.
जानेफळ येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व मूळचे गुजरात राज्याचे निवासी विशाल पडधारिया उर्फ बाबूभैय्या यांना गायनाचा व पारंपरिक वाद्ये वाजवण्याचा छंद होता. गेल्या २५ वर्षापासून नवरात्रीत देवीची स्थापना करून त्यांनी अनेकांना गरबा-दांडिया हा खेळ प्रकार शिकवला. रविवारी रात्री गावातील वीर सावरकर दुर्गा मंडळासमोर ते गरबा खेळत होते. यावेळी विशाल यांना अचानक भोवळ आली. गरबास्थळावरील अन्य उपस्थितांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. जानेफळ येथील व्यावसायिकांनी आज आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहे ,