Home विदर्भ बरं झालं भाऊ खांब उभे केले , तुम्हचे होंडींग तरी लागले ,...

बरं झालं भाऊ खांब उभे केले , तुम्हचे होंडींग तरी लागले , “दिव्या खाली अंधार”

751

 

रविराज घुमे
वर्धा : सेवाग्राम – वर्धा रस्त्यावरील दुभाजकावर ट्रीट लाईट करिता खांब उभे केले . गेल्या वर्षभरापासून ट्रीट लाईट सुरू झाले नाही . मात्र त्या खांबाचा वापर होल्डिग लावण्यासाठी नित्याचा वापर केला जात आहे. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रचार करण्यासाठी लाखो रुपयांचे होल्डिंग त्या खांबावर लाऊन प्रसिद्धी केली. त्यामुळे बरं झालं भाऊ खांब उभे केले. तुमचे होल्डींग तरी लागले, अशी संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
वर्ध्यातील गांधी पुतळ्या पासून महात्मा गांधी यांच्या आश्रम पर्यंत रस्त्याचे चौपदरी करणाचे काम जवळपास संपुष्टात आले आहे. या रस्त्यावर नागरिकांसाठी रस्त्याच्या दुभाजकावर ट्रीट लाईट चे खांब गेल्या वर्षभरापासून उभे केले.मात्र काय अडचण निर्माण झाली कोणास ठाऊक दिवा मात्र लागला नाही.
या रस्त्याने रात्रीला काळोखाचे साम्राज्य पसरले असून रात्रीला अनेक अपघात झाले आहे. मात्र आमदार महोदयाचे याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र गांधीजींचा पुळका आलेल्या या सरकारला गांधीजींच्या नावावर उखळ पांढरे करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
गांधी जयंतीच्या दिनी शासकीय कार्यक्रम वर्ध्याच्या क्रीडा संकुलात आणि त्या कार्यक्रमाचे होल्डींग सेवाग्राम आश्रमापर्यंत म्हणजे प्रचार प्रसार करून गांधी विचाराचे किती अनुकरण आम्हीच करतो. हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनताही ओळखून आहे.
सेवाग्राम येथे रुग्णालय , बापूचा आश्रम , अधोगिक वसाहत असून अनेकजण प्रवास करतात .मात्र याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे सरकार आणि त्यांचे लोकप्रतीनिधी अंधार कायम ठेवणार काय असा सवाल नागरिक करीत आहे.