Home विदर्भ वर्ध्यातील सेवा पंधरवाडा की राजकीय मेवा .पंधरवडा ?

वर्ध्यातील सेवा पंधरवाडा की राजकीय मेवा .पंधरवडा ?

464

 

सेवा पंधरवडा काँग्रेस काळापासून सुरू झाला

रविराज घुमे
वर्धा – सेवा पंधरवाड्यात देण्यात येणारी सेवा ही कुणासाठी आहे असे म्हणायची वेळ आता आली आहे. वर्ध्याच्या विकास भवन येथे आयोजित सेवा पंधरवाड्यात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीच अधिक दिसून येत आहे. नागरिकांच्या कामावर भर देण्यापेक्षा पदाधिकारांच्या लाभाच्या कामाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचे चित्र सेवा पंधर वाड्यात बघायला मिळाले. त्यामुळे पंधरवाड्यातील सेवा राजकीय मेवा ठरला असे म्हणायची वेळ आली आहे. सेवा पंधरवडा 2 ऑक्टोंबर पर्यंत असताना 1 लाच बंद करण्यात आला. त्यामुळे आज आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. ली
तर राजकारण्यांनी बाशिंग बांधत आपल्यामुळेच सेवा पंधरवडा राज्यात राबविला जात असल्याचा आव आणला आहे. पण प्रत्यक्षात सेवा पंधरवाडा ही संकल्पना काँगेस काळापासूनच सुरू झाली आहे.

सर्वसामान्य माणसे कामासाठी आले असताना विविध कागद पत्राचा अभाव असल्याचे उत्तर दिले जाते, तर कधी लॅपटॉप हँग होत असल्याचे कारण पुढे केले जात तर काहींना येथे ऑनलाइन सुविधांच नाही असे सांगितले जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या नागरिकांनी प्रतुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या प्रकाराकडे काँगेस पक्ष मात्र गप्प आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी यांच्या एकच भूमिका असल्याने आम् नागरिकांनी कुणाकडे अडचणी सांगायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पंधरवड्यात राजकीय पक्षांचा आणि आमदाराच्या जवळचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल तर मात्र चुटकीसरशी कामे पूर्ण केली जातात. हा राजकीय दुजाभाव सर्व सामान्य माणसासाठी का? असाच प्रश्न विचारला जात आहे. अनेक नेत्यांची व पदाधिकाऱ्यांनी याच सेवा पंधरवाड्याचा फायदा घेत अधिकाऱ्यांना कामी लावत आपली न होणारी कामे करून घेण्याचा डावच साध्य केला आहे. तर काहींनी कमिशन मिळणारी कामे सेवा पंधरवाड्यात करून घेतली आहे.